*दहेज कार्यक्रमात किरकोळ कारणावरुन इसमाला जिवे ठार मारणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली 10 वर्ष कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दहेज कार्यक्रमात किरकोळ कारणावरुन इसमाला जिवे ठार मारणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली 10 वर्ष कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
*दहेज कार्यक्रमात किरकोळ कारणावरुन इसमाला जिवे ठार मारणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली 10 वर्ष कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा पोलीस ठाण्याचे हद्दीतील गुरु नगर, मामाचे मोहिदा गावातील फिर्यादी नामे संगिताबाई भरत ठाकरे यांचे पती भरत मिमा ठाकरे हे दि. 17 मार्च 2017 रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास गावातीलच विनोद साहेबराव ठाकरे याची चुलत बहीण विमली भाऊराव ठाकरे हिच्या दहेजच्या कार्यक्रमात गेले होते. तेथे पिण्याचा थंड सोडा वाटण्याचे कारणावरुन विनोद ठाकरे व फिर्यादी यांचे पती भरत मिमा ठाकरे यांच्यात वाद होवून झटापट झाली व त्यात सोडयाची काचेची बाटली फुटुन विनोद ठाकरे बाचे उजव्या हातास लागली होती. येका कार्यक्रमात जमलेल्या लोकांनी विनोद व भरत यांचे भांडण आपसात मिटविले. त्यानंतर भरत हा परी गेल्यानंतर दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास पराबाहेरील बाथरुममध्ये लघुशंकेसाठी गेला होता. त्याचवेळो फिर्यादी यांना पती भरत याचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून फियांदी व त्यांची मुलगी सविता या दोघांनी घराबाहेर येवून पाहीले असता बिनोद ठाकरे हा भरत यास त्याचे हातातील लाकडी डेंगान्याने छातीवर, पाठीवर व मानेवर मारहाण करुन भरत यास जमिनीवर खाली पाडून त्याच्या छातीवर बसून गळा दाबत होता म्हणून फिर्यादी हया पती भरत यास आरोपीताच्या तावडीतून सोडविण्यास गेल्या असता विनोद याने फिर्यादी यांनाही ढकलून दिले होते. फिर्यादी यांचा आरडाओरड ऐकून तेथे जमलेल्या नागरीकांनी भरत याची विनोद ठाकरे याचे तावडीतून सुटका केली होती. भरत हा काहीच बोलत नसल्याने फिर्यादी यांनी काही इसमांच्या मदतीने रिक्षातुन त्यास सरकारी दवाखाना, शहादा येथे उपचाराकरीता आणले असता तेचील डॉक्टरांनी भरत यास तपासून मयत झाल्याचे सांगितले होते, त्यावरुन शहादा पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द गु.र.नं. 112/2017, भा.द.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, शहादा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे यांनी आरोपी विनोद साहेबराव ठाकरे यास तात्काळ अटक करत अत्यंत शास्त्रोक्त पध्दतीने सदर गुन्हयाचा तपास करुन महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र सत्र न्यायालय, शहादा येथे सादर केले. सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, शहादा एस. सी. पठारे यांचे समक्ष झालो. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी विनोद साहेबराव ठाकरे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, एस. सी. पठारे, शहादा यांनी मा.द. वि.क. 304 (Part II) अन्वये दोषी ठरवत 10 वर्ष सश्रम कारावास व 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. स्वर्णसिंह गिरासे यांनी पाहिले असून पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि हेमंत मोहिते, पैरवी अंमलदार पो.हे. कॉ./124 परशराम कोकणी, पो.हे. कों/1177 गणेश साबळे, पो.की. 1177 देविदास सूर्यवंशी आणि पो.हे.कॉ. 945 शैलेंद जाधव यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्री दत्ता पवार यांनी अभिनंदन केले आहे.