*"आगामी सण उत्सवाचे नावाखाली अवैधरित्या वर्गणी गोळा कराल तर खबरदार",जबरदस्ती वर्गणी मागणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"आगामी सण उत्सवाचे नावाखाली अवैधरित्या वर्गणी गोळा कराल तर खबरदार",जबरदस्ती वर्गणी मागणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल*
*"आगामी सण उत्सवाचे नावाखाली अवैधरित्या वर्गणी गोळा कराल तर खबरदार",जबरदस्ती वर्गणी मागणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल*
नंदूरबार(प्रतिनिधी):-"आगामी सण उत्सवाच्या काळात व्यापा-यांसह सामान्य नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी घेणा-यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी दिले आहेत." सण उत्सवाच्या काळात वर्गणी हि स्वेच्छेने दयायची असते, परंतु काही व्यक्तींकडून सण उत्सवाच्या काळात जबरदस्तीने व्यापारी तसेच सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा केली जाते. असे जर कोणी जबरदस्तीने वर्गणी मागत असेल तर त्याबाबत डायल 112 क्रमांकावर कॉल करुन पोलीस विभागास कळवावे, अथवा पोलीस अधीक्षक यांचे मोबाईल क्रमांक 9849065629 याचेवर कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी केले आहे.