*डी आर हायस्कूल येथे जिल्हास्तरीय गणितीय कार्यशाळा संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी आर हायस्कूल येथे जिल्हास्तरीय गणितीय कार्यशाळा संपन्न*
*डी आर हायस्कूल येथे जिल्हास्तरीय गणितीय कार्यशाळा संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ महाराष्ट्र राज्य व नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पदग्रहण समारंभ व जिल्हास्तरीय गणितीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद नंदुरबार माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन नरेंद्र सराफ, अध्यक्ष राहुल पाठक, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव प्रशांत पाठक, महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष संजयकुमार निक्रड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील प्राचार्य डॉक्टर रमेश चौधरी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, कार्याध्यक्ष कुंदन पाटील, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, भामरे स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक युवराज भामरे, शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सैंदाणे व हेमंत खैरनार, नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष योगेशकुमार गवते, उपाध्यक्ष दर्शनकुमार अग्रवाल, उपाध्यक्ष मेघशाम धनगर, कार्याध्यक्ष सतीश पाटील, सचिव दिलीप पाटील, विविध शाळांचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका हे उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून न्यू इंग्लिश स्कूल जामनेर चे प्राचार्य नानासाहेब लामखेडे व महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे प्रकाशन समिती प्रमुख शिवशरण बिराजदार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.
आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य गणित महामंडळाचे अध्यक्ष संजय कुमार यांनी गणितामुळेच मन हे एकाग्र होते व विषयांमध्ये आवड निर्माण होते. गणित शिस्त व सहनशीलता शिकवतो व हा विषय पुढे स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांना मदत करतो हे सांगितले.
संस्थेचे चेअरमन नरेंद्र सराफ यांनी गणित विषयाच्या आवडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रगती होते हे सांगितले.
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर रमेश चौधरी यांनी गणित हा विद्यार्थ्यांचा आवडीच्या विषय आहे. गणित शिकवताना विविध शैक्षणिक साधनांचा वापर करावा, नाविन्यपूर्ण उपक्रमात शिक्षकांनी सहभागी व्हावे हे सांगितले.
जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी शिक्षकांनी काळानुसार स्वतः मध्ये बदल करावा विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यास मदत करावी असे आव्हान केले. अध्यक्षीय समारोपात शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर द्यावा विविध शैक्षणिक साधनांच्या शिकवताना उपयोग करावा गणिताबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त आवड निर्माण करावी हे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी करेले यांनी केले प्रास्ताविक योगेश कुमार गवते तर परिचय व सत्कार विशाल मछले यांनी केले तर आभार दिलीप पाटील यांनी मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.