*के. आर. पब्लिक स्कुलमध्ये देवशयनी आषाढी एकादशी साजरी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर. पब्लिक स्कुलमध्ये देवशयनी आषाढी एकादशी साजरी*
*के. आर. पब्लिक स्कुलमध्ये देवशयनी आषाढी एकादशी साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुल ज्यु. कॉलेज नंदुरबार मध्ये आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विठ्ठल भगवान व रुक्मीणी मातेच्या मुर्तिची पुजा शाळेच्या प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी केली. नंतर शिशुकुंज विभागातुन दिंडी यात्रा काढण्यात आली. चिमुकले विठ्ठल रुखुमाईच्या वेषात खुप सुंदर दिसत आहे. विठ्ठल नामाच्या गजरात शाळेचे पटांगण गुंजुन गेले होते. या विठ्ठल रुखुमांची सर्व शिक्षकवृंदांनी मनोभावे पूजन केले. नंतर फुगडी, लेझिम नृत्य करीत या कार्यक्रमाची शोभा वाढ वित होते. प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी आषाढी एकादशीची पार्श्वभुमी व महत्व योग्य उदाहरणा द्वारे विद्यार्थ्यांना समजवुन सांगितले. संस्थेचे चेअरमन किशोर वाणी व उपाध्यक्ष सिध्दार्थ वाणी यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.