*नंदुरबार येथील महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात संपन्न*
*नंदुरबार येथील महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा चिमुकल्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल- रुख्मिणीच्या पालखी पूजनाने झाली. शाळेच्या संचालिका सौ. पिनल शहा यांनी भक्तिभावाने विठ्ठल -रुख्मिणीची आराधना करून पालखीचे पूजन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी रिंगण करत "विठ्ठल- विठ्ठल" असा जयघोष केला आणि पारंपरिक भक्तिरसात नृत्य सादर केले. "पांडुरंग पांडुरंग" या भक्तिगीतावर विद्यार्थ्यांनी सादर केलेले सुंदर नृत्य विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमात विद्यार्थिनी कु. हर्षा सूर्यवंशी, डिंपल सासवाणी आणि आग्या डागा यांनी आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व सांगितले. शाळेच्या शिक्षिका सौ. गायत्री पाठक यांनी एकादशी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी काही चिमुकल्यांनी विठ्ठल आणि रुख्मिणीच्या वेशभूषेत मनमोहक देखावा सादर केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन इव्हेंट कोऑर्डिनेटर सौ. पूजा लोहार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.