*प्रशांत संभाजी जाधव सनदी लेखापाल( सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रशांत संभाजी जाधव सनदी लेखापाल( सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण*
*प्रशांत संभाजी जाधव सनदी लेखापाल( सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण*
मुंबई(प्रतिनिधी):-सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातील प्रशांत संभाजी जाधव हा सनदी लेखापाल (सी.ए.) परीक्षा उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला. दहावी, बारावी व बी. कॉम. परीक्षेतही त्याने उत्तम गुण प्राप्त केले होते. तसेच अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या सी. ए. परीक्षेतही त्याने घवघवीत यश संपादन केले. विशेष म्हणजे कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना जिद्दीने सी. ए. होण्याचा प्रशांतचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आईवडिलांचे आशीर्वाद तसेच कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य, अथक प्रयत्न या मुळे प्रशांतने हे यश संपादन केले, या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रेरणा मित्र मंडळ, रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ, चारकोप कांदिवली, नातेवाईक आणि मित्र मंडळीने सी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रशांतचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.