*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा*
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे पदाधिकारी डॉक्टर वसंत चौधरी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या हस्ते पतंजली ऋषींच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व योग प्रात्यक्षिक शाळेचे प्राचार्य तारकेश्वर पाटील यांनी केले सूक्ष्म व्यायाम, दंडस्थितीतील पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, ताडासन, वृक्षासन बैठकस्थितीतील पश्चिमोत्तासन, वज्रासन, मंडुकासन, शशांकासन व शयनस्थितील अर्धहलासन, पुर्णहालासन, धनुरासन ही आसने तसेज प्राणायाम या सगळ्या क्रिया विद्यार्थ्यांकडून सामूहिकरीत्या करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आपल्या मनोगतातुन योगा विषयी माहिती देऊन योग हा आरोग्यासाठी किती महत्त्वाच्या आहे याच्या जाणीवपूर्वक उल्लेख केला. कार्यक्रमाला शाळेचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश मलखेडे तर पर्यवेक्षक राजीव संगपाळ यांनी केले.