ताजा खबरे:
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
*विरार येथे कुणबी समाज आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*"पारंपरिक इरले, घोंगड्या झाल्या दुर्मिळ,प्लास्टिकच्या वस्तू खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल*
*नवापुर, शहादा व शहर पोलीसांनी केली 88 गोवंश जनावरांची सुटका, 9 आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण व छळ प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल*
*अखेर सी.ओ. यांच्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात झाली*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार शहरातील रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईनचे खड्डे आणि नगर पालिकेचे रस्त्यावरील लाईट पोल व त्यावरील लाईट तसेच रोडावरील झाडे झुडपासह विविध समस्यांबाबत, शिवसेना उबाठा पक्षातर्फे पालिका म

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार शहरातील रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईनचे खड्डे आणि नगर पालिकेचे रस्त्यावरील लाईट पोल व त्यावरील लाईट तसेच रोडावरील झाडे झुडपासह विविध समस्यांबाबत, शिवसेना उबाठा पक्षातर्फे पालिका म

  • Share:

*नंदुरबार शहरातील रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईनचे खड्डे आणि नगर पालिकेचे रस्त्यावरील लाईट पोल व त्यावरील लाईट तसेच रोडावरील झाडे झुडपासह विविध समस्यांबाबत, शिवसेना उबाठा पक्षातर्फे पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईनचे खड्डे आणि नगर पालिकेचे रस्त्यावरील लाईट पोल व त्यावरील लाईट तसेच रोडावरील झाडे झुडपासह विविध समस्यांबाबतचे निवेदन शिवसेना उबाठा पक्षामार्फत महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वात पालिका मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. पंधरा दिवसाच्या आत समस्या सोडविल्या नाही व दुरुस्ती केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याच्या इशारा देण्यात आला आहे.
शिवसेना उबाठा पक्षामार्फत शहरातील विविध समस्यांबाबत पालिकेचे प्रशासन अधिकारी जयसिंग गावित यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर महानगर प्रमुख पंडित माळी, उपमानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख राज पाटील यांच्या सह्या आहे. नंदुरबार शहरातील सर्व रस्ते हे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळणी झालेली आहे, नंदुरबार शहरात ठिकठिकाणी मोठ मोठे खडे पडल्यामुळे दररोज कोठेना कोठे अपघात होत असतांत, आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या खड्ड्यात पाणी भरल्यामुळे कोणालाही रस्ता कळत नाही, त्यामुळे अपघात होत असतात तसेच नंदुरबार शहराची ड्रेनेज लाईन कोठे ना कोठे चॉकप असल्यामुळे त्याचे सर्व पाणी रस्त्यावर वाहत आहे त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत आहे. ते चॉकअप काढण्यासाठी सुध्दा रस्ता खोदकाम करण्यात येत असुन तेथे सुध्दा मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे सुध्दा वारंवार ड्रेनेज लाईन तुटून त्याचे सर्व पाणी रस्त्यावर वाहत असते. सद्या पावसाळयाचे दिसत असल्यामुळे व वादळी वा-यामुळे रस्त्यावरील झाडे व पडक्या इमारती यांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, त्या सर्व अडथळा ठरणाऱ्या पडक्या इमारती व झाडे झुडपे कापुण रस्ता सुरळीत करावा तसेच नंदुरबार शहरातील स्ट्रीट लाईट, पथदिवे काही ठिकाणी चालु तर काही ठिकाणी बंद असतात त्यामुळे तेथे अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते तेथे चोरी व अपघात होण्याची सुध्दा दाट शक्यता असते. तसेच नंदुरबार शहरात सर्व धर्मियांची उत्सवाचे दिवस येणार आहेत त्यामुळे सुध्दा रस्ता सुरळीत करावा.
आता नंदुरबार शहरात शाळा महाविद्यालय सुध्दा सुरु होतील व रस्त्यावर वर्दळ वाढेल सर्व विद्यार्थी हे रिक्षा, ॲपेरिक्षा, व्हॅन किंवा खागजी वाहनाने शाळेत येण्या-जाण्यासाठी प्रवास करतात त्यावेळेस सत्यातील ड्रेनेज लाईनचे खड्डे किंवा रस्त्यावरील पठलेले मोठ मोठे खड्डे यात काही अपघात झाल्यास विद्यार्थ्यांचे व सामान्य नागरिकांचे काही कमी जास्त झाल्यास त्यास प्रशासन नगर पालिका स्वताः जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी.
तसेच नंदुरबार शहरातील श्री. दादा गणपती व श्री. बाबा गणपती यांचा मिरवणुकी मार्गावरील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाणारा मार्ग म्हणजे खुटवरील सोनार पासुन ते साक्री नाक्या पर्यंत या रस्त्यावर सुध्दा मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहे तो रस्ता सुध्दा सुरळीत करण्यात यावा व त्यारस्त्यवरील सर्व खड्डे बुजविण्यात यावे व रस्ता सुरळीत करण्यता यावा. येत्या 15 दिवसात रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेज लाईन, ड्रेनेज लाईनचे खड्डे, स्ट्रीट लाईट, झाडे झुडपे, पडक्या इमारती यांचा योग्य रितीने उपाय योजना करण्यात यावी जर उपाययोजना केली नाही तर शिवसेना स्टाईलने तिव्र आंदोलन नगर पालिके समोर केले जाईल त्याच्या होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जवाबदारी प्रशासनाची राहिल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणे तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न*
June, 04 2025
*विरार येथे कुणबी समाज आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
June, 04 2025
*"पारंपरिक इरले, घोंगड्या झाल्या दुर्मिळ,प्लास्टिकच्या वस्तू खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल*
June, 04 2025
*नवापुर, शहादा व शहर पोलीसांनी केली 88 गोवंश जनावरांची सुटका, 9 आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण व छळ प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल*
June, 04 2025
*अखेर सी.ओ. यांच्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात झाली*
June, 04 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज