*नवापुर, शहादा व शहर पोलीसांनी केली 88 गोवंश जनावरांची सुटका, 9 आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण व छळ प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापुर, शहादा व शहर पोलीसांनी केली 88 गोवंश जनावरांची सुटका, 9 आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण व छळ प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल*
*नवापुर, शहादा व शहर पोलीसांनी केली 88 गोवंश जनावरांची सुटका, 9 आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण व छळ प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने जिल्हयाभरात गोवंश जनावरे अवैधरित्या कत्तल करण्याचे इरादयाने डांबून ठेवण्यात आलेले असल्याची गोपनिय माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील विविध पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र पशु संरक्षण व छळ प्रतिबंध अधिनियमाद्वारे कारवाई करण्यात आली. त्यामध्ये नवापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व स्टाफ यांनी एजाज अब्दुलगणी शेख, रा. राजीव नगर, नवापूर जि. नंदुरबार याचे ताब्यातून एकुण 57 गोवंश जनावरांची सुटका केली असून शहादा पोलीस ठाण्याचे हद्दीत पोलीस निरीक्षक निलेश देसले व स्टाफ यांनी इरफान मुक्तार खान, रा. अमन कॉलनी, मलोनी, ता. शहादा जि. नंदुरबार याचे ताब्यातुन एकुण 18 गोवंश जनावरांची सुटका केली आहे. तसेच शहर पोलीस ठाण्याचे हद्दीत पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ व स्टाफ यांनी शेख यासीन अरमान कुरेशी, रा. बिस्मील्ला चौक, नंदुरबार, फिरोज खान जहीर खान कुरेशी, रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार, आसिफ मरजान कुरेशी, रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार, कुरेशी जाविद नवाब, रा. अलिसाब मोहल्ला, नंदुरबार, जफ्फर ऊर्फ शंभू आमन कुरेशी, रा. बिस्मील्ला चौक, नंदुरबार, आजीम शेख शहाबुद्दीन कुरेशी, रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार, जब्बार सत्तार कुरेशी, रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार यांचे ताब्यातुन एकुण 13 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे. सदर कारवाईत 7 लाख 6 हजार 300 रुपये किमतीची एकुण 88 गोवंश जनावरे हे अवैधरित्या कत्तल करण्याचे इरादयाने निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत मिळुन आल्याने सर्व जनावरांची सुटका करुन त्यांची तातडीने चारापाण्याची व्यवस्था करुन त्यांना गोशाळेत दाखल करण्यात आले असुन आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5(ए), 5 (बी), 9 व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम ।। इ. कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली नवापुर, शहादा व शहर पोलीसांकडून करण्यात आली आहे.