*कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे-सी.के.ठाकरे*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे-सी.के.ठाकरे*
*कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे-सी.के.ठाकरे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत कमी खर्चाचे कांदाचाळ/लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सी. के. ठाकरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. सध्या शेतकरी कांदा जमिनीवर पसरवून किंवा स्थानिक पातळीवर तयार केलेल्या चाळींमध्ये साठवतात, ज्यामुळे कांदा सडून मोठे नुकसान होते आणि कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर नकारात्मक परिणाम होतो. शास्त्रशुद्ध कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची गुणवत्ता टिकून राहते आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो, त्यामुळे कांदाचाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी कमी खर्चाच्या कांदाचाळ/लसूण साठवणूक गृहासाठीचे मापदंड सुधारित करण्यात आले आहेत. 5 ते 25 मे.टन, 25-500 मे.टन आणि 500 -1000 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळी/लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी क्षमतेनुसार अनुदान उपलब्ध आहे. प्रकल्पाचा खर्च रुपये 30 लाखापेक्षा जास्त असल्यास बँक कर्ज घेणे बंधनकारक असून, अर्थसहाय्य हे बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय राहील. यासाठी पात्रता, शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक असून, सात/बारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे अनिवार्य आहे. शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचे गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था आणि सहकारी पणन संघ यांना घेता येईल. इच्छुक शेतकऱ्यांनी काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कांदाचाळ/लसूण साठवणूक गृह या घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'फलोत्पादन' या घटकाखाली अर्ज सादर करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.