*जी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात 12वी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात 12वी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*
*जी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात 12वी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील जी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात 12वी बोर्डाच्या परीक्षेत यशस्वी झालेले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य क. ब. चौ. उ. म. वी. डॉ. एम जे रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ एम जे रघुवंशी यांनी सांगितले की, आपण आपल्या प्रचंड मेहनतीने यश संपादन केले आहे त्या बद्दल सर्व गुणवंतांचे तुमचे अभिनंदन पुढेही असेच मेहनत करून आपला आपल्या शिक्षकांना महाविद्यालयाला आई वडिलांना अभिमान वाटेल लौकिकात भर पडेल असे गुण संपादन करून जीवनात यशस्वी व्हा असे सांगून पुढील भावी उज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी वाणिज्य शाखेतून प्रथम व महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त तडवी इरम मनोज वाणिज्य शाखेतून द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे गायकवाड मयुरी मोतीलाल विरवणी अंशीका हरीश यांनी प्राप्त केले होते विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक मितल दशरथ राठोड, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे अग्रवाल योगिनी अतुल, जैन सयामी संजय कुमार यांनी प्राप्त केले होते तर कला शाखेतून सौदांकर पायल छोटू द्वितीय व तृतीय अनुक्रमे पाडवी प्राची विलास व शिरसाट जागृती देवानंद यांनी प्राप्त केले या सर्व गुणवंतांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम जे रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस पी पाटील महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक सुदेश रघुवंशी उपस्थित होते तत्पूर्वी कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. एस. जे. साक्रीकर यांनी केली आभार प्रकटन प्रा के सी साठे यांनी तर सूत्रसंचलन प्रा एन आर कोळपकर यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा ए बी गावित, प्रा एस डी वाडेकर, प्रा सी के गिरासे, प्रा मोईन शेख व प्रा हर्षबोध बैसाने प्रा विजय सिसोदिया यांनी परिश्रम घेतले.