*‘जागतीक क्लबफूट दिवस उत्साहात साजरा,बालकांच्या पालकांचे सुखद अनुभव कथन व नियमित उपचार घेतलेल्या बालकांच्या पालकांचा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हस्ते सन्मान*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘जागतीक क्लबफूट दिवस उत्साहात साजरा,बालकांच्या पालकांचे सुखद अनुभव कथन व नियमित उपचार घेतलेल्या बालकांच्या पालकांचा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हस्ते सन्मान*
*‘जागतीक क्लबफूट दिवस उत्साहात साजरा,बालकांच्या पालकांचे सुखद अनुभव कथन व नियमित उपचार घेतलेल्या बालकांच्या पालकांचा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हस्ते सन्मान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा रुग्णालय नंदुरबार अंतर्गत ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ तसेच ‘जिल्हा तात्काळ हस्तक्षेप केंद्र’ (डी.ई.आय.सी.) तसेच क्युअर इंडिया (रोटरी) या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 6 जून 2025 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेश पाडवी, यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक क्लबफुट दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुलोचना बागुल, डॉ.शामकांत पाथरवट मान्यवर उपस्थित असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा पर्यवेक्षक मनोहर ढीवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक सादर केले. क्युअर इंटरनेशनल इंडिया ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने महाराष्ट्र शासनाशी करार करून महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयांमध्ये क्लबफूट उपचाराची मोफत सुरुवात केली आहे. आज पर्यंत महाराष्ट्रा मध्ये 44 क्लबफुट चिकित्सालये कार्यरत असून 5000 हून अधिक क्लबफूट बाधित मुलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहेत. नंदुरबार जिल्ह्यात देखील एकूण 15 जन्मजात क्लबफूट व्यंग असलेल्या बालकांचे मोफत उपचार करण्यात आले असून त्या सर्व उपस्थित पालकांनी आपले सुखद अनुभव कथन केले व जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथे नियमित उपचार घेतलेल्या बालकांच्या पालकांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नरेश पाडवी यांच्या हस्ते पालकांना गुलाबपुष्प तसेच बालकांना क्लबफूट ब्रेसेस, वाटप करून सन्मानीत करण्यात आले. ही उपकरणे क्लबफूटची योग्य स्थिती राखण्यासाठी वापरली जातात, ज्यामुळे पुन्हा दुखापत टाळता येते, त्यामध्ये सामान्यतः दोन खास शूज असतात जे एका बारने जोडलेले असतात, जे खांद्याच्या रुंदीवर पाय वेगळे ठेवतात. भविष्यात बाळाला कोणताही आधाराशिवाय चालण्यास मदत करतात. कार्यक्रमाच्या प्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना बागूल यांनी उपस्थित सर्व पालकांना क्लबफूट हि सर्वसामान्यपणे एक जन्मजात शारीरिक विकृती असून यामध्ये पाय आतल्या बाजूला वळलेले असतात. जर या विकृतीचा वेळीच इलाज केला नाही तर बाळाला आयुष्य भरासाठी अपंगत्व येऊ शकते. तसेच आलेल्या पालकांना उपचाराचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नरेश पाडवी यांनी उपस्थित सर्व पालकांना तसेच जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान केले की, सदर ‘क्लबफुट’ पायाचे व्यंग असणाऱ्या बालकांचे उपचार लहानपणीच झाल्यास आपण त्यांना अपंग होण्यापासून वाचवू शकतो, तसेच पोन्सेटी प्लास्टर उपचार पद्धती अतिशय सोपी, प्रभावी व स्वस्त असून या जिल्हा शासकीय रुग्णालयात हे उपचार मोफत केले जात आहेत. तसेच वेळीच क्लबफूट बाधित मुलांचे निदान करून त्यांना जिल्हा रुग्णालयात तत्काळ उपचार सुरु करण्यात यावेत. क्लबफूट बाधित व्यक्ती अपंग राहत कामा नये. पूर्ण जगात प्रत्येकी 1000 बालकांमध्ये एक ते दोन बालके क्लबफूट बाधित जन्माला येतात. पूर्ण जगात दरवर्षी क्लबफूट बाधित जन्मणाऱ्या मुलांची संख्या 2,20,000 इतकी आहे. भारतात दरवर्षी 40000 आणि महाराष्ट्रात 2400 पेक्षा अधिक मुले क्लबफूट बाधित जन्माला येतात. क्लबफूट पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि तो हि कुठल्याही शस्त्रक्रियेशिवाय. त्यासाठी पोन्सेटी उपचार पद्धती खूपच फायदेशीर ठरली आहे. त्या साठी आमची RBSK आणि DEIC ची यंत्रणा पूर्ण जोर लावून कार्य करत आहे. शा.वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथे प्रत्येक मंगळवारी ओ. पी. डी क्रमांक 21 येथे क्लबफूट क्लिनिक चालवले जात आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी हि विनंती. क्लबफुट आजारसंबंधी आणि मोफत उपचार चिकित्सालयांसंबंधी अधिक माहिती साठी राज्य क्लबफुट सहायता क्रमांक 8800020522 व समन्वयक लीना पाटील सहायता क्रमांक 8800020465 तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथके, डी.ई.आय. सी.विभाग या ठिकाणी संपर्क करावा, तसेच सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय होळकर यांच्या मुलगा आर्यन विजय होळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांच्या हस्ते सर्व क्लबफुट व्यंग असलेल्या बालकांना व त्यांच्या पालकांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला. व शुभेच्छा देण्यात आल्यात. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री. मनोहर ढीवरे, श्री. करण वसावे, त्याच बरोबर डी.ई. आय.सी. व्यवस्थापक डॉ. कपिल दुसेजा यांनी मार्गदर्शन केले, क्युअर इंटरनेशनल इंडिया ट्रस्टचे क्लब फुट समन्वयक लीना पाटील तसेच भैया अहिरे, महेश नगराळे, प्रीतेश खैरनार, अस्मिता वसावे, डॉ.एंजल वसावे, शुश्मा बिरारे, भागेश्री पगारे, सामाजिक कार्यकर्ते कल्पेश बाबर यांनी परिश्रम घेतले.