*क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवरायांचे पंंचामृताभिषेकाने शिवराज्याभिषेक साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवरायांचे पंंचामृताभिषेकाने शिवराज्याभिषेक साजरा*
*क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवरायांचे पंंचामृताभिषेकाने शिवराज्याभिषेक साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठानच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा पंचामृताभिषेक करुन साजरा करण्यात आला. यावेळी नंदुरबारातील जुनी नगरपालिका जागेवरील छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृृती पुतळ्यास पुर्ष्पापण करुन अभिवादन करण्यात आले. अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352 शिवराज्याभिषेक सेेोहळा दि. 6 जून 2025 रोजी नंदुुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीने पंचामृताभिषेक अनोख्या उपक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी नंदुरबार शहरातील जुन्या नगरपालिका परिसरात सुशोभित चबुतर्यावरील रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दही व दुध पंंचामृताने विधीवत अभिषेक करण्यात आले. या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, असा जयघोष करीत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महेेश मराठे, पप्पु मराठे, मोहिनीराज राजपूत, दिपक मराठे, अजय राजपूत, यशराज मराठे, उपेंद्र राजपूत, प्रकाश मराठे, राजा मराठे, भगतसिंग राजपूत, निलेश पांडे, राजू मिस्तरी, विजय कोळी, मयूर चौधरी, भावेश जैन, महेंद्र चौधरी, राहुल मराठे, ऋषीकेश मराठे, कृष्णाराजे प्रविण मराठे, शिवांशराजे प्रविण मराठे आदी उपस्थित होते.