*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानांचे आयोजन-योगेश पाटील*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानांचे आयोजन-योगेश पाटील*
*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानांचे आयोजन-योगेश पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे 6 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता ‘'नागरी कर्तव्य आणि राजशिष्टाचार’ व ‘पर्यावरण संरक्षण’ या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली असल्याचे संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य योगेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून कार्यक्रमाचे उद्धाटन राज्याचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे संतोष पाटील हे वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून पाणी फांऊडेशनचे जिल्हा समन्वयक भूषण ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमास संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही संस्थेचे प्राचार्य पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.