*समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
नाशिक(प्रतिनिधी):-रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुगणालय मदत कक्षातील सर्वांनी गतिशीलता, पारदर्शकता आणि संवेदशनशीलतेने काम करुन समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण तथा संशोधन अकादमी (मित्रा) नाशिक येथे आयोजित मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची रचना विश्वस्त भावनेने केली आहे. परदेशातील औद्योगिक, सामाजिक दायित्व निधी प्रमाणपत्र मिळविणारा देशातील पहिला कक्ष आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर वैद्यकीय क्षेत्रात करण्याची संकल्पना 2014 पासून राबविण्यास सुरूवात केली. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची संस्थात्मक रचना उभी केली असून सामान्य माणसाला मदत होईल, अशी या कक्षाची रचना आहे. आता या कक्षाची जिल्हास्तरावरही स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयाच्या कामकाजाच्या बाबतीतही पारदर्शक आणून दुरूपयोग टाळावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख नाईक यांनी प्रास्ताविक केले. 'रुग्ण मित्र' योजना मतदारसंघनिहाय सुरू करण्यात येत आहे. सामाजिक संस्थांची फंडासाठी मदत घेणार असून केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती एका प्लॅटफॉर्म आणण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी हे आरोग्यदूत म्हणून काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी राज्यस्तरीय कक्षाचे प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय तथा प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था डॉ. सुनील भोकरे, सहकक्ष प्रमुख शरद घावटे, उपकक्ष प्रमुख शेखर नामदास, जनसंपर्क अधिकारी डॉ. जगदीश सकवान, वैद्यकीय समन्वयक डॉ. सवानंद सोनार, प्रशासकीय सल्लागार दत्तात्रय विभुते यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हास्तरीय कक्षाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



