ताजा खबरे:
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे फ्रेशर्स कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*फुपेरे भोवडवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या रंगमंचाच्या बांधकामास सुरुवात आमदार किरण सामंत यांची वचनपूर्ती*
*लांजा शहरात तातडीने शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याची जनतेची मागणी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न*
*शहादा येथे 45वा फेस्कॉम दिवस उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*तरुणास इलेक्ट्रिक पोलवर चढवून त्याच्या मृत्युस कारणीभुत असणाऱ्या अमळथे येथील वायरमनला न्यायालयाने ठोठावली 10 वर्ष शिक्षा व 25 हजारांचा दंड*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*तरुणास इलेक्ट्रिक पोलवर चढवून त्याच्या मृत्युस कारणीभुत असणाऱ्या अमळथे येथील वायरमनला न्यायालयाने ठोठावली 10 वर्ष शिक्षा व 25 हजारांचा दंड*

  • Share:

*तरुणास इलेक्ट्रिक पोलवर चढवून त्याच्या मृत्युस कारणीभुत असणाऱ्या अमळथे येथील वायरमनला न्यायालयाने ठोठावली 10 वर्ष शिक्षा व 25 हजारांचा दंड*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीतील अमळथे गावातील फिर्यादी नामे दिपक दरबारसिंग गिरासे यांचे शेताजवळ रस्त्यावर असलेला विजेचा जुना ट्रान्सफार्मर खराब झाल्याने दि. 14 जानेवारी 2022 रोजी दुपारी शरद जाधव (वायरमन) वय-41 रा. खोंडामळी ता.जि. नंदुरबार हा नवीन ट्रान्सफार्मर बसविणेकरीता शेतात दोन व्यक्तिसोबत आला होता तेव्हा तेथे आजुबाजूचे इतर 7 ते 8 शेतकरी देखील मदतीकरीता उपस्थित होते. सर्वांनी मिळून विजेचा जुना ट्रान्सफार्मर उतरवून नवीन ट्रान्सफार्मर बसविला होता. त्यानंतर ट्रान्सफार्मरला झंपर जोडण्याकरीता वायरमन शरद जाधव याने कोपर्ली सबस्टेशनला हजर असलेले ऑपरेटर ललित किशोर चंदने यास फोनव्दारे लाईट बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या, लाईट बंद झाल्यानंतर वायरमन शरद जाधव यांनी फिर्यादी यांचा भाऊ पंकज दरबारसिंग गिरासे यास सदर विजकामाचे कोणतेही कौशल्य माहिती नसतांना तसेच कोणतेही सुरक्षेची साधने न देता पंकज यास इलेक्ट्रिक पोलवर झंपर जोडण्यासाठी चढण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलवर चढून पंकजने झंपरचे दोन फेज जोडले व तिसरा फेज जोडत असतांना त्यास इलेक्ट्रिक शॉक लागला व तो खांब्यावरच तारांना चिटकून मयत झाला होता. सदर घटना पाहून फिर्यादी व तेथील लोकांनी आरडाओरड केली असता वायरमन शरद जाधव हा त्याठिकाणाहून पळून गेला होता. त्याअन्वये नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 20/2022 भा.द.वि. कलम 304 प्रमाणे दि. 15 जानेवारी 2022 रोजी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी सदर गुन्हयाचा तपासात आरोपी वायरमन शरद जाधव यास अटक करुन सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्‌तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र सत्र न्यायालय, नंदुरबार येथे सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी वायरमन शरद जाधव विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, आर. जी. मलशेट्टी, नंदुरबार यांनी भा.द. वि.क.-304 अन्वये दोषी ठरवत 10 वर्ष सश्रम कारावास व 25,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. तुषार कापडीया यांनी पाहिले असून पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि सागर नांद्रे, पैरवी अंमलदार पोहेकों/नितीन साबळे, पोहेकॉ पंकज बिरारे, पोहेकॉ राजेंद्र गावीत आणि पोहेको शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे फ्रेशर्स कार्यक्रम उत्साहात संपन्न*
December, 15 2025
*फुपेरे भोवडवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या रंगमंचाच्या बांधकामास सुरुवात आमदार किरण सामंत यांची वचनपूर्ती*
December, 15 2025
*लांजा शहरात तातडीने शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याची जनतेची मागणी*
December, 15 2025
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न*
December, 15 2025
*शहादा येथे 45वा फेस्कॉम दिवस उत्साहात संपन्न*
December, 14 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज