*देवरे विद्यालयाच्या परंपरेप्रमाणे एन.एम.एम.एस.परीक्षेत विद्यार्थ्यांनी संपादन केले घवघवीत यश*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयाच्या परंपरेप्रमाणे एन.एम.एम.एस.परीक्षेत विद्यार्थ्यांनी संपादन केले घवघवीत यश*
*देवरे विद्यालयाच्या परंपरेप्रमाणे एन.एम.एम.एस.परीक्षेत विद्यार्थ्यांनी संपादन केले घवघवीत यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एन.एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. इ.8 वीतील 25 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते ज्यातून 8 विद्यार्थी एन.एम. एम. एस.शिष्यवृत्ती पात्र ठरले. त्यात तनुषा ज्ञानेश्वर पाटील, सिद्धी मिनीनाथ पाटील, चेतन दिपक पाटील, मनिष प्रकाश पाटील, भावेश संतोष पानपाटील,
भुमिका प्रकाश मराठे, राज भगवान मराठे तेजस्विनी विनोद भोसले हे शिष्यवृत्ती पात्र ठरले. विद्यार्थ्यांना प्रती वर्षी रु.12 हजार प्रमाणे सलग चार वर्षांपर्यंत प्राप्त होतील. तसेच अकरा विद्यार्थी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे (सारथी) या शैक्षणिक वर्षात आठवीच्या वर्गातील एन.एम.एम.एस.परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या चार लक्षित गटांतील असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 'छत्रपती
राजाराम महाराज सारथी' शिष्यवृत्ती यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थिनींना नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी नऊ हजार 600 रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. विद्यालयाचे इतर मागास व सर्वसाधारण प्रवर्गातील उत्तीर्ण 11 विद्यार्थ्यांमध्ये दर्शन विकास पाटील, दिवेश प्रफुल पाटील, जितेंद्र सुरेश पाटील, ज्ञानराज भाईदास पाटील, दत्तात्रय चुनीलाल पाटील, कल्पेश सोपान पाटील, वरुण गणेश सैंदाणे, लोकेश योगीराज पाटील, गुंजन रविंद्र पाटील, रुपेश विशाल पाटील, विपुल राजेंद्र पाटील सारथी शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. सदर यशस्वितांना मुख्याध्यापक डी. डी.साळुंके, उपशिक्षक वाय.डी. बागुल, सी.व्ही.नांद्रे, डी.बी.भारती, एम. डी.नेरकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वितांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, सचिव नरेंद्र देवरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शैलजा देवरे व पदाधिकाऱ्यांकडून तसेच पंचक्रोशीतील विखरण, नाशिंदा, खापरखेडा, बोराळा पालक वृंद व ग्रामस्थांकडून कौतुकासह अभिनंदन केले जात आहे.