*कुंभवडे वेतकर वाडी येथे श्री हनुमान जयंती उत्सव दिमाखात साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुंभवडे वेतकर वाडी येथे श्री हनुमान जयंती उत्सव दिमाखात साजरा*
*कुंभवडे वेतकर वाडी येथे श्री हनुमान जयंती उत्सव दिमाखात साजरा*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे कुंभवडे गावातील वेतकर वाडी येथील श्री हनुमान मंदिात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री हनुमान जयंती महोत्सव 12 एप्रिल रोजी अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. या उत्सवा दरम्यान आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, चाकरमानी आणि अनेक मान्यवरांनी मंदिराला भेट दिली आणि मारुतीरायाचे दर्शन घेतले. पहाटे दीपोत्सव करून श्री हनुमान यांचे विधिवत पूजन करण्यात आले तदनंतर आरती आणि हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. त्यानंतर सत्यनारायण महापूजा ठेवण्यात आली होती. दुपारी भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
महिलांसाठी हळदीकुंकू, महिलांची फुगडी आणि सर्वांसाठी स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या खेळामध्ये विजेत्याला या वर्षी ‘पैठणी’ चे बक्षीस ठेवण्यात आले होते.
प्राथमिक शाळेला मदत आणि प्रोत्साहन या उपक्रमाद्वारे प्राथमिक शाळा क्र 4 आणि शिशू वर्गातील मुलांसाठी अशा एकूण 50 मुलाना वेतकरवाडी विकास मंडळातर्फे शाळेसाठी उपयुक्त भेट वस्तू प्रदान करण्यात आली.
गावच्या शाळेतील विद्यार्थ्याना रंगमंच उपलब्ध करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने रात्री 8 वाजता कुंभवडे शाळा क्र 4 च्या मुलामुलींचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मुलांतर्फे एकूण 25 गीतांवर नृत्य सादर करण्यात आली. अतिशय मंत्र मुग्ध करणाऱ्या कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले होते. रात्री उशिरा पर्यंत कार्यक्रमाची रेलचेल आणि प्रेक्षकांची गर्दी होती. वेतकर वाडी येथील या श्री हनुमान जयंती सोहळ्याची प्रसिद्धी आणि प्रसार उत्तरोत्तर वाढत आहे तसेच वेतकर वाडीतील वेतकर, बारस्कर, मयेकर, पडवळ,जोशी, पडेलकर, शिरवडकर ग्रामस्थ आणि चाकरमानी यांचे सहकार्य आणि सहभागामुळे उत्सव सोहळा दिमाखात पार पडला असे वेतकर वाडी विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.