*आदिवासी विकास विभागाचा इतरत्र वळवलेला निधी परत करा-विश्व आदिवासी सेवा संघटना*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी विकास विभागाचा इतरत्र वळवलेला निधी परत करा-विश्व आदिवासी सेवा संघटना*
*आदिवासी विकास विभागाचा इतरत्र वळवलेला निधी परत करा-विश्व आदिवासी सेवा संघटना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी विकास विभागाच्या वित्तीय वर्षातील मंजूर निधि मधून इतर योजना करता वळविण्यात आलेला निधी पुन्हा आदिवासी विकास विभागाला वर्ग करणेबाबतचे निवेदन विश्व आदिवासी सेवा संघटनेने मुख्यमंत्री याना पाठविले आहे.
निवेदनाचा आशय असा महाराष्ट्र राज्याचा मागील व चालू अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले, याबद्दल आपले संपूर्ण आदिवासी समाजातर्फे हार्दिक आभार यामुळे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरपूर मदत होणार आहे. समाजातील दुर्बल घटकांचा विकास करणे हे यातून दिसून येते. परंतु सदर मंजूर निधीमधून आपल्या प्रतिष्ठित व आपल्या सरकारच्या सर्वात महत्वाच्या माझी लाडकी बहीण योजना राबविणेकामी सात हजार कोटी रुपयांचा निधी सदर योजनेकरिता वर्ग करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे सदर योजना ही तात्कालिक असून देखील सदर योजनेकरिता आपण पूर्वनियोजित आदिवासी समाजाच्या विकासासाठी उपलब्ध निधीतील तरतुदींबाबत विचार न करता या योजनेकरिता निधी वळविणे म्हणजे एक प्रकारे गरीब दुर्बल असलेल्या आदिवासी समाजावर अन्याय केल्यासारखे होईल. आदिवासी समाज हां दुर्गम व रानावनात राहून आपली संस्कृती जपणारा समाज आहे. त्याला अन्याय राजकारण यातले काही कळत नाही, परंतु असे त्यांच्या निधीवर दुसऱ्या योजनेचे भवितव्य किती दिवस अवलंबून राहणार आपली माझी लाडकी बहीण योजना ही आदिवासी समाजापेक्षा आणि त्यांच्या विकासापेक्षा नक्कीच मोठी असून शकत नाही. तथापि आपण या योजनेकरिता वर्ग केलेला निधी तात्काळ पुनःश्च आदिवासी विकास विभागास वर्ग करावा तसेच माझी लाडकी बहीण, माझा लाडका भाऊ सारख्या व्यर्थ योजना तात्काळ बंद कराव्यात जेणेकरून सरकारचे व पर्यायाने सामान्य नागरिकांच्या घामाचा पैसा सत्कारणी लागेल.
सदर निधी तात्काळ वर्ग करावा व आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय थांबवावा. अन्यथा आदिवासी समाज याविरोधात राज्यभर आंदोलन करून सरकारला त्यांनी केलेल्या चुकीच्या निर्णया बाबत माफी मागायला लावेल, यांची नोंद घ्यावी निवेदनावर जितेंद्र टी बागुल केंद्रीय संस्थापक तथा अध्यक्ष, संभाजी आर जगताप केंद्रीय संस्थापक सचिव, विनायक के गावीत केंद्रीय संस्थापक सहसचिव, अँड कोमल जे पावरा केंद्रीय संस्थापक सल्लागार, गुलाब एस गावीत केंद्रीय संस्थापक कोषाध्यक्ष, सुभाष जी कोकणी केंद्रीय संस्थापक सदस्य , अँड गीतांजली वाय पाडवी धडगांव तालुका सल्लागार, जितेंद्र जी तडवी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष, दिनेश जी सोनवणे नंदुरबार तालुका अध्यक्ष, सतिष पी भुसावरे नंदुरबार तालुका सचिव, कालूसिंग डी वळवी धडगांव तालुका अध्यक्ष, कुणाल एस गावीत धुळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.