*छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीरांतर्गत तळोदा तालुक्यात विविध सेवा व दाखले वाटपाचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीरांतर्गत तळोदा तालुक्यात विविध सेवा व दाखले वाटपाचे आयोजन*
*छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीरांतर्गत तळोदा तालुक्यात विविध सेवा व दाखले वाटपाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):–जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागामार्फत तळोदा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळ स्तरावर होणाऱ्या या शिबीरांमध्ये ग्रामस्थांना विविध शासकीय सेवा, दाखले व प्रमाणपत्रे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शिबीरांमध्ये रहिवासी, उत्पन्न, जात, अपंग, वृद्धापकाळ, नॉन क्रिमीलेयर, शेतजमीन नोंदणी, 7/12 उतारे, फेरफार, घरपट्टी प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रांचा समावेश असून, विविध शासकीय विभागांनी आपल्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉल उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, ग्रामस्थांना या शिबिरांची पूर्व माहिती व्हावी यासाठी दवंडी तसेच व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांचा वापर करून जनजागृती केली जाणार आहे. शिबीरादरम्यान संबंधित विभागांचे कर्मचारी ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन करतील व त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात येईल. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा मिळणार असून, प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता व वेग येणार आहे.