*शिंदे गटाच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांचा डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिंदे गटाच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांचा डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश*
*शिंदे गटाच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांचा डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील तिसी ग्रामपंचायत क्षेत्रात शिंदे गटाच्या शिवसेना पक्षात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे नेतृत्व स्वीकारून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यावर आणि नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे यापुढे त्यांच्या नेतृत्वात आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी काम करू; असे या कार्यकर्त्यांनी याप्रसंगी सांगितले.
तिसी गावातील शिंदे गटाचे शिवसेना पक्षाचे उपसरपंच रतन चिंतामण भील, ग्रामपंचायत सदस्य भगवान रूपा भील, युवराज मागु भील, कचरू चिंतामण भील, सुरसिंग रामचंद्र भील, भिमसिंग मालचे, कालूसिंग भील आणि अन्य कार्यकर्ते यांचा त्यात समावेश आहे. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते कमळ चिन्ह असलेले स्कार्फ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे संघटन गावागावात वाढवण्यासाठी आपल्याला एकत्रित आणि संघटितपणे काम करायचे आहे. पक्षीय धोरण आणि विचार लक्षात घेऊन आपण सर्व ते कार्य करून दाखवाल; असा विश्वास या प्रसंगी डॉक्टर गावित यांनी व्यक्त केला.