*भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हयातील 16 मंडळ अध्यक्षांची घोषणा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हयातील 16 मंडळ अध्यक्षांची घोषणा*
*भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हयातील 16 मंडळ अध्यक्षांची घोषणा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-भाजपा संघटन पर्व 1 जानेवारी पासुन सुरु झाले होते. संघटन पर्व चे एकुण 4 टप्पे करण्यात आले. पहिल्या टप्प्यात भाजपाने प्राथमिक सदस्य करण्याचे उददीष्ट ठेवले त्या अनुषंगाने जिल्हयाभरात एकुण 1 लाख 15 हजार प्राथमिक सदस्य करण्यात आले. दुसरा टप्पा सक्रीय सदस्य नोंदणीचा राबविण्यात आला यात 100 रु भरुन जिल्हयाभरात 1000 पेक्षा जास्त सदस्य नोंदणी करण्यात आली. तीसरा टप्प्यात बुथ अध्यक्ष व मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यासंदर्भात राबविण्यात आले.
आज दि 20 एप्रिल रोजी भाजपा प्रदेश अध्यक्ष तथा महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण व भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या आदेशाने भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा निवडणुक प्रमुख सदानंद रघुवंशी यांच्या सुचने प्रमाणे जिल्हयातील 16 मंडळ अध्यक्षांचा घोषणा करण्यात आल्या. यामध्ये नंदुरबार शहर अध्यक्षपदी नरेश कांकरीया, नंदुरबार ग्रामीण अध्यक्षपदी दिपक पाटील, प्रकाशा मंडळ अध्यक्षपदी विजय पाटील, शहादा शहर अध्यक्षपदी ज्ञानेश्वर चौधरी, लोणखेडा मंडळ अध्यक्षपदी नितीन पाटील, म्हसावद मंडळ अध्यक्षपदी विश्वास ठाकरे, तळोदा शहर अध्यक्षपदी गौरव वाणी, तळोदा ग्रामीण अध्यक्षपदी दरबारसिंग पाडवी, अक्कलकुवा मंडळ अध्यक्षपदी भुषण पाडवी, मोलगी मंडळ अध्यक्षपदी आकाश वसावे, धडगांव मंडळ अध्यक्षपदी पिंटु पावरा, तोरणमाळ मंडळ अध्यक्षपदी हिरालाल पाडवी, नवापुर शहर अध्यक्षपदी दिनेश चौधरी, नवापुर ग्रामीण अध्यक्षपदी सत्यपाल वसावे, विसरवाडी मंडळ अध्यक्षपदी दिलीप वळवी, धानोरा मंडळ अध्यक्षपदी डॉ.गणेश चव्हाण याप्रमाणे सदर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मंडळ निवडणुक प्रमुख म्हणुन बळीराम पाडवी, डॉ.सपना अग्रवाल, विनोद जैन, ॲड सत्यानंद गावित, प्रकाश चौधरी, संदिप अग्रवाल, ईश्वर साठे, सुदाम चौधरी, प्रा. पंकज पाठक, श्रीमती आशा पाडवी यांनी काम पाहिले. नवनियुक्त मंडळ अध्यक्षांना आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.राजेश पाडवी, डॉ.सुप्रिया गावित, डॉ. शशिकांत वाणी, अजय परदेशी, अविनाश माळी, अजय वसावेसह जिल्हयाभरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. असे प्रसिध्दी प्रमुख प्रेमराज पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये प्रसिध्द केले.