*चोरी गेलेल्या 9 गोवंश जनावरांचा शोध घेऊन नंदुरबार तालुका पोलीसांनी दिले फिर्यादी यांचे ताब्यात*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चोरी गेलेल्या 9 गोवंश जनावरांचा शोध घेऊन नंदुरबार तालुका पोलीसांनी दिले फिर्यादी यांचे ताब्यात*
*चोरी गेलेल्या 9 गोवंश जनावरांचा शोध घेऊन नंदुरबार तालुका पोलीसांनी दिले फिर्यादी यांचे ताब्यात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी वाल्मीक रमण तांबोळी, रा. रनाळे ता.जि. नंदुरबार यांचे शेताचे गोठ्यातुन 7 बैल व 2 गायी अज्ञात चोरट्याने चोरी केले बाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे भा. न्या. संहिता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने दि. 18 एप्रिल 2025 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनिल भाबड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील चोरी गेलेली जनावरे ही तळोदा बाजारमध्ये विक्रीसाठी आणली आहेत, अशी खात्रिशीर माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल भाबड व पथक यांनी फिर्यादी यांच्या समवेत तळोदा बाजारात जाऊन पाहणी करता फिर्यादी यांनी त्यांचे जनावरांना ओळखले. त्याअन्वये सदर ठिकाणी ज्या इसमाकडे ते बैल विक्रीस होते त्यास सदर जनावरे कोठून आणले बाबत विचारणा करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यास ताब्यात घेऊन अधिकची विचारपूस करता त्याने त्याचे नाव अल्ताफ हुसेन गुलाम हैदर मक्राणी, वय 4.3 वर्षे, रा. मिटयाफळी, अक्कलकुवा जि. नंदुरबार असे कळवून सदरचे बैल हे त्याने विनोद ठोग्या वसावे, वय 23 वर्षे, रा. चिवलउतार, अक्कलकुवा, जि. नंदुरबार यांच्याकडुन विक्रीसाठी आणले असल्याचे सांगितले. तसेच त्याचे राहते घरी काही जनावरे बांधुन ठेवले असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार नमुद इसमांकडुन एकुण 9 गोवंश जनावरांची सुटका करुन सदर जनावरांना फिर्यादी यांचे ताब्यात सुस्थितीत देण्यात आले व नमुद दोन्ही इसमांना नंदुरबार तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल भाबड, पोहेकॉ मनोज विसपुते, ज्ञानेश्वर पाटील, मनोज चव्हाण, संजय मनोरे, पोकों/दिपक मालचे यांनी केली आहे.