*घरफोडीचा गुन्हा 24 तासांचे आत उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, शहादा येथे दाखल गुन्हयातील आरोपींकडून एकुण 1 लक्ष 51 हजार 500 रुपये किमतीचा रोख रक्कम व सोन्याचांदीचा मुददेमाल हस्तगत*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घरफोडीचा गुन्हा 24 तासांचे आत उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, शहादा येथे दाखल गुन्हयातील आरोपींकडून एकुण 1 लक्ष 51 हजार 500 रुपये किमतीचा रोख रक्कम व सोन्याचांदीचा मुददेमाल हस्तगत*
*घरफोडीचा गुन्हा 24 तासांचे आत उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, शहादा येथे दाखल गुन्हयातील आरोपींकडून एकुण 1 लक्ष 51 हजार 500 रुपये किमतीचा रोख रक्कम व सोन्याचांदीचा मुददेमाल हस्तगत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी नजमा अब्दुल रहमान खाटीक, रा. कुंभार टेक मच्छी बाजार, शहादा जि. नंदुरबार यांचे त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडुन कोणीतरी अज्ञात इसमांनी प्रवेश करुन एकुण 1 लक्ष 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणून शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.254/ 2025 भा.न्या.सं. कलम 305(अ), 331(3), 331(4) प्रमाणे 18 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना 18 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा शहादा शहरातील मीरानगर भागात राहणा-या मोनु ऊर्फ समीर शहा याने त्याचे साथीदारांसह केला आहे, बाबत खात्रीशीर बातमी मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कारवाई करणेकामी सुचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून इसम नामे मोनु ऊर्फ समीर शहा याचा शहादा शहरातील मीरानगर परिसरात शोध सुरु असतांनाच तो मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मोनु ऊर्फ समीर मेहमूद शहा, वय 24 वर्षे, रा. मीरा नगर, शहादा, जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन नमुद गुन्हयाबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार शोएबखान शेरुखान पठाण, वय 30 वर्षे, रा. शहीद अब्दुल हमीद चौक, शहादा, जि. नंदुरबार 2. जुबेर ऊर्फ पप्पू हुसेन बेग, वय 21 वर्षे, रा. शहीद अब्दुल हमीद चौक, शहादा, जि. नंदुरबार अशांनी मिळून केला असल्याची कबुली दिली. त्याअन्वये आरोपींकडुन एकुण 1 लक्ष 51 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये 51 हजार 500 रुपये रोख रक्कम तर 1 लक्ष रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये शहादा पोलीस ठाणे 254/2025 हा गुन्हा 24 तासांचे आत उघडकीस
आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदर ताब्यातील तिनही इसमांना शहादा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षकl श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच पोना/पुरुषोत्तम सोनार, विकास कापूरे, मोहन ढमढेरे, पोशि /शोएब शेख, सतिश घुले अशांनी केली आहे.