*पालपेणे गावातील रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पालपेणे गावातील रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*
*पालपेणे गावातील रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*
गुहागर(प्रतिनिधी):-तालुक्यातील पालपेणे गावात संतोष जैतापकर वैद्यकीय टीम व अध्यक्ष संदीप खैर व वालावलकर रुग्णालय यांच्या पुढाकाराने श्रीहनुमान प्रासादिक विकास मंडळ यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, हेमोग्लोबिन, रक्त तपासणी यांसारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या, तसेच रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमात वालावलकर रुग्णालय यांच्या वैद्यकीय पथकाने तांत्रिक व वैद्यकीय सेवा पुरवली. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक, भाजपा ओबीसी मोर्चा, जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर उपस्थित होते, आणि त्यांनी चांगल्या प्रकारे शिबिरा साठी आलेल्या सर्वाना मार्गदर्शन केले. आणि कोणतीही वैद्यकीय विषयी समस्या असतील तर आमच्या वैद्यकीय टीम पर्यंत घेऊन या नक्कीच आम्ही सहकार्य करू असा शब्द दिला. आणि भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन श्री हनुमान प्रासादिक विकास मंडळ, मुंबई तसेच संतोष जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आले.
या शिबिरासाठी संतोष जैतापकर वैद्यकीय टीम खास मुंबई मधून येऊन शिबिरासाठी उपस्थित होती. ग्रामस्थ, तरुण मंडळी आणि स्वयंसेवक यांच्या सक्रिय सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.