*आपले सरकार पोर्टल जागरुकता अभियान*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आपले सरकार पोर्टल जागरुकता अभियान*
*आपले सरकार पोर्टल जागरुकता अभियान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील तमाम नागरीकांना कळविण्यात येत की, 1 मे 2025 पासून नंदुरबार तहसिल कार्यालयामार्फत आपले सरकार पोर्टल जागरुकता अभियान राबविण्यात यन असून, आपले सरकार पोर्टलवर शासनामार्फत जनतेस विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या जात असतात, त्यांचा तपशिल खालीलप्रमाणे
महसूल विभाग
वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ, नागरिक प्रमाणपत्र, पत दाखला, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज, अल्पभूधारक, शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला, सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र, डोंगर दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र, औद्योगिक प्रयोजनार्थ
जमीन खोदण्याची परवानगी (गौण खनिज उत्खनन)
ग्रामविकास व पंचायत राज विभाग
जन्म नोंद दाखला, विवाह नोंदणी दाखला, ग्रामपंचायत येणे बाकी दाखला, नमूना 8 चा उतारा, मृत्यु नोंद दाखला, दारिद्य रेषेखालील असल्याचा दाखला, निराधार असल्याचा दाखला, नमूना 8 चा उतारा,
कामगार विभाग
दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण, कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी, कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी, कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण, बिडी आणि सिगार (नांकरीच्या शती) वर्कस अधिनियम 1966 अंतर्गत औद्योगिक वस्तूंची नोंदणी, कारखाना नोंदणी, कारखाना नूतनीकरण, मालकी हक्काचे हस्तांतरण, बाष्पके संचालनालय, इमारत व इतर बांधकाम मजूर (नोकरीचे नियमन
आणि शर्ती) अधिनियम,
1966 अंतर्गत आस्थापनांची नोंदणी.
जलसंपदा विभाग ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कटक मंडळे (Cantonment Board) यांना घरगुती पाणी वापर परवाना देणे, महानगरपालिका, खाजगी विकसक, विशेष नगरविकास प्रकल्प यांना घरगुती/औद्योगीक पाणी वापर परवाना देणे, पाणी वापर संस्थेस देय पाणी हक्क मंजूरी देणे, पाणी वापर संस्थेस पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे, बिगर सिंचनाची पाणीपट्टी थकबाको दाखला देणे, पाणीपट्टी देयक तक्रार निवारण करणे, लाभक्षेत्राचा दाखला देणे, नदी जलाशया पासून अंतराचा दाखला देणे, उपसा सिंचन परवानगी, औद्योगीक प्रयोजनासाठी पाणी वापर परवाना देणे
वन विभाग
वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या गुरांसाठी मंजूर करायची नुकसान भरपाई, वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी मंजूर करायची नुकसान भरपाई, बांबू पुरवठ्यासाठी बुरूड समाजाची नोंदणी, वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या अथवा अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीना मंजूर करावयाचे वित्तीय सहाय्य, पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (मंडल स्तर), वनेत्तर जमिनी बाबतचा दाखला मिळविण्याकरिता अर्ज
नोदंणी व मुद्राक विभाग
मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे, दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई- पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे, दस्ताची प्रमाणित नक्कल देणे, नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करून देणे. दस्तनोंदणीकरणे, विवाह प्रमाणपत्राच्या प्रमाणित नकला देणे. इतर पद्धतीने अगोदरच झालेल्या विवाहाची विशेष कायदा, 1954 अंतर्गत नोदणी करणे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग
सावकारी व्यवसायासाठी परवाना नुतनीकरण देणे, मृत्युपत्राचा सीलबंद लखोटा जमा करणे, परत घेणे व उघडणे. सह जिल्हानिबंधक कार्यालयात नोदणी झालेल्या दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे. सहकारी संस्थांची नोंदणी करणे, शेतकरी / लाभार्थी यांना तांत्रिक सेवा उपलब्ध करुन देणे, रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करणे
गृह विभाग
विदेशी कलाकारांच्या सहभागास परवानगी, ध्वनीक्षेपकाचा परवाना देणे, सभा, संमेलन, मिरवणूक, शोभा यात्रा इ. करिता परवानगी देणे, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, हॉटेल, बार इ. करिता ना-हरकत प्रमाणपत्र देणे, कागदपत्रांचे साक्षांकन, मनोरंजनाचे कार्यक्रमांना ना-हरकत परवाना देणे, निमशासकीय, खाजगी संस्था इ. मध्ये नोकरीकरिता वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे, शस्त्र परवान्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे, भारतीय नागरिकांना परदेशात जाण्यासाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र देणे. (शिक्षणासाठी /नोकरीसाठी प्रवेशपत्र (व्हीसा)
परिवहन विभाग
दुय्यम अनुज्ञप्ती जारी करणे,भाडे खरेदी / गहाण करार नोंद करणे, वाहनांच्या हस्तांतरणाची नोंद करणे, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे, नवीन वाहन नोंदणी करणे आणि नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे, वाहन मालकाच्या मृत्युनंतर वाहनांच्या हस्तांतरणाची नोंद करणे, वाहन हस्तांतरणासाठी ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहन पत्ता बदलण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, भाडे खरेदी/गहाण करार नोंद रद्द करणे, अनुज्ञप्ती नुतनीकरण करणे, तात्पुरती नोंदणी क्रमांक जारी करणे, इतर राज्यातून आलेल्या वाहनांना नोंदणी क्रमांक जारी करणे, शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे, पक्की अनुज्ञप्ती जारी करणे
वरीलप्रमाणे नमूद सेवा व शासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या विविध सेवा आपले सरकार सेवा पोर्टलवर शासनामार्फत दिल्या जात असुन सदर सेवा मिळविण्याबाबत जनतेला तालुक्याच्या प्रत्येक वेगवेगळ्या विभागांमध्ये शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागतं त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. म्हणून त्यांना घरबसल्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा महसूल विभाग व इतर विभागातील सगळ्या प्रकारचे दाखले / प्रमाणपत्रे घरूनच अर्ज सादर करुन अपलोड करता यावे. तसेच त्यांच्या कुठल्याही विभागाच्या संदर्भात काही अडचणी समस्या असतील तर त्याच्या बाबतीत देखील ते तक्रार आपले सरकार पोर्टल वर करू शकता आणि याद्वारे एक डिजिटल साक्षरता देखील वाढीस लागणार आहे. याबाबीचे प्रशिक्षण तहसिल कार्यालय नंदुरबार मार्फत दिनांक 1 मे, 2025 रोजी इयत्ता 8 वी ते पदव्युत्तर पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.