*शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार चंदकांत रघुवंशी यांच्या विषयी सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकणाऱ्या विरोधात शहादा पोलीस स्टेशनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार चंदकांत रघुवंशी यांच्या विषयी सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकणाऱ्या विरोधात शहादा पोलीस स्टेशनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्
*शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार चंदकांत रघुवंशी यांच्या विषयी सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकणाऱ्या विरोधात शहादा पोलीस स्टेशनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार श्री.चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्व स्वीकारत शहादा तालुक्यासह संपुर्ण नंदुरबार जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत असल्याकारणाने व संपुर्ण नंदुरबार जिल्ह्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा राजकीय व सामाजिक कामात जनतेच्या भल्यासाठी सक्रीय सहभाग वाढला असल्याने तसेच सामान्य जनतेत प्रचंड लोकप्रियता मिळत असल्याने विरोधकांच्या तंबुत अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे आमदार चंदकांत रघुवंशी यांच्या जाहिर सत्कार प्रसंगी केलेल्या भाषण दरम्यात केलेल्या व्यक्तव्यांचा विपर्याससह संपुर्ण भाषणाचे तोडमोड करीत सोशल मीडियावर चंद्रकांत रघुवंशी यांची बदनामीकारक व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे तसेच कायदा- सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर विरोधकांकडून टाकली गेली असुन सदर पोस्ट विविध ग्रुप वर फिरवली जात असल्याकारणाने शिवसेना शिंदे गटाचे शहादा येथील पदाधिकरी व शिवसैनिकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांचा विरोधात शहादा पोलीस स्टेशनात रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रार दाखल प्रसंगी शहादा पोलीस स्टेशनात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तक्रारी अर्जावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख डॉ.राजेंद्र पेंढारकर, सुपडू खेडकर, हिरालाल अहिरे, लोटन धोबी, संतोष वाल्हे, यशवंत चौधरी, मनलेश जायसवाल, युवा सेनेचे शहादा शहर प्रमुख सागर चौधरी, मुकेश चौधरी, राजरत्न बिरारे, शुभम कुवर, तुकाराम भोई, प्रवीण सैदाणे, नितीन चौधरी, दीपक महिरे, प्रवीण बोरदे, शशिकांत बिरारे, रोहित बिरारे, दिगंबर भंडारे, गुलाब सुतार यांच्या सह्या आहेत.