*नंदुरबार येथील सुवार्ता अलायन्स चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त प्रवचनासह सामूहिक प्रार्थना*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील सुवार्ता अलायन्स चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त प्रवचनासह सामूहिक प्रार्थना*
*नंदुरबार येथील सुवार्ता अलायन्स चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त प्रवचनासह सामूहिक प्रार्थना*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील सुवार्ता अलायन्स चर्च मध्ये गुड फ्रायडे निमित्त प्रवचनासह सामूहिक प्रार्थना करण्यात आली. येथील सुवार्ता अलायन्स चर्च मार्फत गुड फ्रायडे निमित्त आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सामुहिक प्रार्थनासह प्रवचन करण्यात आले. यासाठी पुणे येथील प्राचार्य संजय सिंग यांनी प्रवचन दिले. यावेळी त्यांनी गुड फ्रायडे म्हणजे काय गुड फ्रायडे चे महत्व कथन केले. गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार या दिवशी येशू ख्रिस्त सर्व पापी जणांसाठी स्वतः वधस्तंभ स्वीकारला पापासाठी येशू ख्रिस्ताने स्वतःच्या बळी दिला व सर्व जगाला सार्वकालीन जीवन दिले म्हणून या शुक्रवारला उत्तम शुक्रवार असे म्हटले जाते. तसेच येशूच्या वधस्तंबावरील शेवटच्या सात शब्दांवर आधारित अध्यात्मिक प्रवचन सिंग यांनी दिले. यावेळी चर्चचे अध्यक्ष डॉ राजेश वळवी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळेस अनुप वळवी यांनी सभांचे चालन केले. जे एच पठारे, ग्लॅडविन जयकर, लाजरस वळवी, लोंढे, राजीव मार्गे हे उपस्थित होते. मंडळीचे कार्यकारणी सदस्य नूतनवर्षा वळवी, प्रेमानंद लवणे, मार्था सुतार, सुरेश जांभीलसा, सबस्टिंग जयकर, सत्यजित नाईक, दिलीप नाईक, विश्वास पाडवी, राजेंद्र व्यास, दिलीप वळवी, लता कालू, हर्षानंद कालू, डॉ राजेश वसावे, नंदा वसावे, संदीप पाटील, कुसुम व्यास, डोंगरे यांच्यासह मान्यवर, धर्मगुरू व समाज बांधव उपस्थित होते. ख्रिस्ती समाजामार्फत गेल्या रविवारपासून तर येणाऱ्या रविवारपर्यंत गुड फ्रायडे निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात गेल्या रविवारी झावळ्याचा रविवार पाळण्यात आला यानिमित्त चर्च परिसरात झावळ्यांच्या फांद्या घेऊन मिरवणूक काढण्यात आली. तसेच प्रार्थना करण्यात आली. येणाऱ्या रविवारी ईस्टर संडे निमित्त प्रवचन व सामूहिक प्रार्थना करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.