*अक्कलकुवा येथील आमसभा आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा येथील आमसभा आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न*
*अक्कलकुवा येथील आमसभा आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न*
अक्कलकुव(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यात आजपर्यंत एकही नक्षलवादी नसताना शासकीय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा नक्सलाईट भत्ता त्वरित बंद करा नक्षललाईट एरिया बनविण्याचे षडयंत्र रचले जात असून, तालुक्याला बदनाम केले जात आहे, असे सूचित करीत तालुक्यातील कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत, अक्कलकुवा येथील आमसभा आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या सभागृहात दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाली. यावेळी तहसीलदार विनायक घुमरे, गटविकास अधिकारी सुवर्णा पवार, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सरपंच उषा बोरा, माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष पृथ्वीसिंग पाडवी, सहसंपर्कप्रमुख लक्ष्मण वाडीले, शिवसेना लोकसभा अध्यक्ष ललित जाट, सिनेट सदस्य डॉ दिनेश खरात, तालुकाध्यक्ष तुकाराम वळवी, कान्हा नाईक, मगन पाडवी, कपिलदेव चौधरी आदी प्रमुख उपस्थितीत होते. अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार आमच्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते, आम सभेत नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून नागरिकांना वंचित ठेवले जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली तसेच वैयक्तिक लाभाचे योजना चिरीमिरी दिल्याशिवाय होत नसल्याचे गंभीर तक्रार करण्यात आली यावेळी उपस्थित कर्मचाऱ्याकडे पुरेशी माहिती नसल्याने आमदार पाडवी यांनी इतिहास खडसावत आवश्यक ती माहिती संकलित करून सादर करण्याचे 💬 तहसील कार्यालयांतर्गत पुरवठा शाखेमध्ये देखील वर्षानुवर्षी रेशन कार्ड मिळत नसून धान्यही मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या पुरवठा विभागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या, यावेळी तहसीलदार विनायक घुमरे यांनी याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले गौण खनिज वाहतूक संदर्भात तसेच रेती वाहतूक संदर्भात समस्या मांडण्यात आल्या, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी केवळ आकस बुद्धीने अन्यायकारक कारवाई केल्याचे, ललित जाट व खापरचे सरपंच किरण पाडवी यांनी तक्रार केल्याने, या विषयावर काही काळ खडाजंगी झाली. आमदार पाडवी यांनी सांगितले की, कायदा धाब्यावर बसून मनमानीपणे कारवाई केल्यास यापुढे सहन केले जाणार नाही कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले जर बिघडवण्याचा प्रयत्न करीत असतील तर या गंभीर बाबी बाबत शासनाकडे याबाबत तक्रार केली जाईल, पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त उप अभियंता वाघ यांनी तक्रारी असलेल्यांवर तत्काळ कारवाई न केल्यास तुमची चौकशी लावले जाईल अशा स्पष्ट सूचना केल्या. शिक्षणाच्या दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शाळांना भेटी देऊन तपासणी करावी दुर्गम भागातील शिक्षक नियमित शाळेत जातात का याबाबत अधिक सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आरोग्य विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, विभाग बालविकास कल्याण विभागासह सर्व विभागांनी विकासाच्या योजना तसेच लोक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करून कुठलीही तक्रार होणार नाही याबाबत अधिक सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी केल्या. या बैठकीला विविध विभागांचे विभाग प्रमुख तालुक्यातील सरपंच तसेच नागरिक उपस्थित होते. अक्कलकुवा तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख तसेच त्यांच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयीच राहावे अशी सक्त सूचना आमसभेत केली. जेणेकरून नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण त्वरित होईल तसेच प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून विकास कामांचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी यावेळी दिल्या तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजवावे कामचुकारांनी तालुक्यातून बाहेर जावे अन्यथा घरी बसावे असेही सुनावले. अक्कलकुवा तालुक्याचे आमसभा तब्बल पंधरा वर्षानंतर झाली असून या आमसभे त नागरिकांनी मांडलेल्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्यात याव्यात मी आमदार असेपर्यंत आम सभांमध्ये खंड पडू देणार नाही असेही आमदार पाडवी यांनी सांगितले. आमसभेला उपस्थित राहण्याची सूचना करूनही जे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहिले नाही त्यांच्यावर कारवाईसाठी ठराव करून शासनाला पाठविण्याचेही यावेळी सुचित केले. मोलगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा अनुपस्थितीत असल्याने प्रश्नांची सरबत्ती अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्यावर झाली. तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे वैयक्तिक लाभाच्या योजनेत वाटप करण्यात आलेले साहित्य दर्जाहीन असून ते निकामी ठरत आहे या कार्यालयात कुठलेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही हे कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे दुकान असल्याच्या गंभीर आरोप शिवसेना लोकसभा प्रमुख ललित जाट यांनी यावेळी केला.