*अक्कलकुवा श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ अध्यक्षपदी इंद्रपालसिंह राणा, तर सचिवपदी माधव साळी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ अध्यक्षपदी इंद्रपालसिंह राणा, तर सचिवपदी माधव साळी*
*अक्कलकुवा श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ अध्यक्षपदी इंद्रपालसिंह राणा, तर सचिवपदी माधव साळी*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा शहरातील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी माजी पंचायत समिती उपसभापती इंद्रपालसिंह राणा यांची तर सचिवपदी माधव साळी यांची निवड करण्यात आली नुकत्याच झालेल्या बैठकीत ही सर्वानुमते निवड करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष सुभाष सोनवणे होते. अक्कलकुवा शहरातील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाची नूतन कार्यकारणी निवडीची बैठक सोरापाडा येथील श्री कालिका माता मंदिराच्या सभामंडपात संपन्न झाली या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली नूतन कार्यकारणीचे अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी उपसभापती इंद्रपालसिंह राणा उपाध्यक्ष विक्रमसिंह चंद्रवंशी उपाध्यक्ष रमेश साळवे सचिव माधव साळी सहसचिव कालिदास लोहार खजिनदार रमण सोनवणे यांची तर सल्लागार पदी सुभाष शिंपी, व्ही. डी. कुलकर्णी, डी. डी. जोशी यांची निवड करण्यात आली नूतन अध्यक्ष इंद्रपालसिंह राणा यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या मोठा अनुभव असल्याने त्यांच्या या निवडीने या जेष्ठ नागरिक मंडळास अधिक चालना मिळून विधायक कामे घडतील. "या ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्षपदी माझी निवड केल्याने मी जेष्ठ नागरिकांचे प्रथम आभार व्यक्त करतो मला मिळालेल्या या संधीमुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी कामे करण्यासाठी मी प्रयत्नशील राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहील अशी प्रतिक्रिया इंद्रपालसिंह राणा यांनी व्यक्त केली.