*कंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक पाटील बिनविरोध*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक पाटील बिनविरोध*
*कंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक पाटील बिनविरोध*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कंढरे येथील ग्रा.पं च्या सरपंचपदी रामकृष्ण अशोक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बिनविरोध निवडीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी आमदार कार्यालयात त्यांच्या सत्कार केला. सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायतीच्या सभागृहात विशेष बैठकीचे रनाळे मंडळ अधिकारी कविता पचलुरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. त्यांना सहाय्य ग्रामपंचायत अधिकारी योगिता न्हावी, ग्राममहसूल अधिकारी डोंगरदिवे यांनी केले. विहित मुदतीत सरपंचपदासाठी रामकृष्ण अशोक पाटील यांच्या एकमेव अर्ज दाखल झाला असता त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. आमदार कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी नवनियुक्त सरपंच रामकृष्ण पाटील यांच्या सत्कार केला. याप्रसंगी शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, उपसरपंच शरद भील, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील,शेतकी संघाचे संचालक प्रभाकर पाटील, माजी सरपंच निंबा पाटील, गोकुळ पाटील, नितीन पाटील, ठाणसिंग भिल, रमेश पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते. कंढरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शरद भील त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप चैत्राम पाटील यांची देखील निवड झाल्याने त्यांच्या सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी केला.