*बिरसा फायटर्सच्या दणक्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार, ग्रामपंचायत जवखेडा येथील भ्रष्टाचारात प्रथमदर्शनी 3 ग्रामसेवक दोषी?*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बिरसा फायटर्सच्या दणक्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार, ग्रामपंचायत जवखेडा येथील भ्रष्टाचारात प्रथमदर्शनी 3 ग्रामसेवक दोषी?*
*बिरसा फायटर्सच्या दणक्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार, ग्रामपंचायत जवखेडा येथील भ्रष्टाचारात प्रथमदर्शनी 3 ग्रामसेवक दोषी?*
शहादा(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत जवखेडा येथील सरपंच व ग्रामसेवक संतोष सुरसिंग गिरासे यांच्या मनमानी कारभाराची व भ्रष्टाचाराची चौकशी डी.बी. बेलदार विस्तार अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी चौकशी मध्येच थांबविली आहे, चौकशी न करून भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना तात्काळ निलंबित करा, या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून दिनांक 6 मार्च 2025 रोजी देण्यात आले होते. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी भ्रष्टाचारी किडे पंचायत समितीतून हाकला, अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली होते. त्याच दिवशी बी.डी. बेलदार चौकशी अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी रमेश जाधव बरडे, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत जवखेडा, राहुल कालीदास वाढीले, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत जवखेडा व संतोष सुरतसिंग गिरासे, विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत जवखेडा यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीत म्हटले आहे की, 18 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामपंचायत जवखेडा येथे चौकशी केले असता ग्रामपंचायत जवखेडा येथे ऑक्टोबर 2022 ते आजअखेर कार्यरत असणा-या 3 ग्रामपंचायत अधिकारी यांनी संपूर्ण दप्तर योजनानिहाय कॅशबुक, व्हावचर, एमबी, उपयोगिता प्रमाणपत्र, काम पूर्णत्वाचा दाखला इत्यादी 3 दिवसात चौकशी अधिकारी यांच्याकडे पंचायत समिती शहादा येथे सादर करावे, असे निर्देश देण्यात आले होते. परंतु संबंधित 3 ग्रामपंचायत अधिकारी यांनी अद्यापही दप्तर सादर केले नाही, त्यामुळे पुढील चौकशी करण्यात आली नाही. यावरून आपण आपल्या कार्यरत कालावधीमध्ये ग्रामपंचायत जवखेडा येथे अनियमितता केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून ६ 6 मार्च 2025 रोजी याबाबत निवेदन देण्यात आले असून ग्रामपंचायत अधिकारी यांनी 10 मार्च 2025 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समिती शहादा येथे उपस्थित राहावे. सदर दिवशी अनुषांगिक दस्तऐवज चोकशीकामी उपलब्ध करून न दिल्यास आपल्याविरुद्ध एकतर्फी कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी,अशा आशयाची नोटीस चौकशी अधिकारी डी.बी.बेलदार यांनी ग्रामपंचायत जवखेडा येथील तत्कालीन व विद्यमान अशा 3 ग्रामसेवकांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे या 3 ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे. सदर नोटीसीची प्रत बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेस पाठविण्यात आली आहे.