*कोणी निधी देता का निधी, आंगले गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांची शासनदरबारी आर्त हाक*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोणी निधी देता का निधी, आंगले गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांची शासनदरबारी आर्त हाक*
*कोणी निधी देता का निधी, आंगले गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांची शासनदरबारी आर्त हाक*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील आंगले गावांतील गेली कित्येक वर्षापासून रखडलेली विकास कामे मार्गी लागावी शासनाकडून गावाच्या पायाभूत विकासासाठी भरघोस निधी मिळावा यांसाठी आंगले गावांतील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत
यांनी शासन दरबारी अनेक वेळा निवेदनाद्वारे त्याशिवाय वेगवेगळ्या माध्यमांतून, स्थानिक लोकप्रतिनिधी तत्कालीन आमदार, विद्यमान आमदार तसेच रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री यांच्या गाठीभेटी घेऊन मागणी केली आहे. अनेकदा प्रयत्न करून सुद्धा निधी मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच या विकास कामासंदर्भात गावातील अनेक लोकांनी पत्रव्यवहार केलेला आहे तरीही शासनाकडून आंगले गावाला निधी देण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते विलासराव यांनी व्यक्त केली आहे. आंगले गावाला अनेक समस्या भेडसावत आहेत त्यापैकी गावातील मुख्य रस्ता. रामेश्वर मंदिर समोरील मोरी लहान असल्याकारणाने रुंदीकरण करणे. वरची राऊतवाडी येथील घरांना असलेला धोका टाळता यावा यासाठी ओढयालगत संरक्षक भिंत बांधणे, विद्युत ट्रान्सफॉर्मर नवीन मिळावा. नवीन थ्री फेज लाईन टाकून मिळावी. विद्युत जुना ट्रान्सफॉर्मर नवीन जागेत स्थलांतर करून मिळावा, राजापूर आगार ते राजापूर रेल्वे स्टेशन एसटी बस शीळ- गोठणे व्हाया आंगले रस्त्याची झालेली दयनीय अवस्था,
गंजलेले विद्युत खांब बदलून मिळणे, नेटवर्कचा मोठा इश्यू असून रेंज नसल्याने अनेक समस्या उद्भ़वत आहेत मोबाईल टाॅवर उभारण्याची जनतेची मागणी आहे. आपण डिजिटल स्मार्ट इंडियाच्या गोष्टी करतो तसेच डिजिटल ग्रामपंचायत असा पण टेंबा मिरवतो परंतु जिथे सोयी सुविधांचा अभाव असेल तर त्याचा काय फायदा? असा सवाल राऊत यांनी केला आहे.