*होळीसाठी सर्व रास्तभाव दुकानांत धान्य पोहोच; लाभार्थ्यांनी त्वरित उचल करून घ्यावे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांचे आवाहन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*होळीसाठी सर्व रास्तभाव दुकानांत धान्य पोहोच; लाभार्थ्यांनी त्वरित उचल करून घ्यावे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांचे आवाहन*
*होळीसाठी सर्व रास्तभाव दुकानांत धान्य पोहोच; लाभार्थ्यांनी त्वरित उचल करून घ्यावे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण वेळेवर करण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या निर्देशानुसार आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्या असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्राकान्वये कळविले आहे.
जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानांत मार्च महिन्याचे धान्य पोहोचविण्यात आले असून, 12 मार्च 2025 पर्यंत 50% लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप ज्या लाभार्थ्यांनी धान्य घेतलेले नाही, त्यांनी आपल्या शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या रास्तभाव दुकानातून त्वरित धान्य उचल करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी केले आहे. ईकेवायसी बंधनकारक ; लाभ बंद होऊ शकतो!
धान्य उचल करताना शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांची ईकेवायसी व मोबाईल सीडिंग अद्ययावत असणे गरजेचे आहे. जर लाभार्थ्यांनी अद्याप ईकेवायसी केले नसेल, तर ते रास्तभाव दुकानात जाऊन तत्काळ पूर्ण करावे. तसेच, मेरा ईकेवायसी अॅपद्वारे देखील लाभार्थी 31 मार्च 2025 पर्यंत घरबसल्या ईकेवायसी करू शकतात. दिलेल्या मुदतीत ईकेवायसी पूर्ण न झाल्यास योजनेचा लाभ बंद होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. होळीपूर्वी अन्नधान्य उपलब्ध करण्यावर भर. होळी हा जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी विशेष महत्त्वाचा सण आहे. अनेक कुटुंबे कामानिमित्त स्थलांतरित झालेली असतात, मात्र होळी साजरी करण्यासाठी गावी परत येतात. त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्याला अन्नधान्य मिळण्यास विलंब होऊ नये, याकरिता जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी होळीपूर्वीच सर्व रास्तभाव दुकानांत धान्य पोहोचविण्याचे निर्देश दिले होते.
लाभार्थ्यांनी दिलेल्या वेळेत धान्य उचलून घ्यावे.
जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले धान्य उचल करून घ्यावे आणि होळी सण आनंदाने साजरा करावा, असे आवाहन केले आहे.