*ग्रामपंचायत कळसवली येथे साजरा करण्यात आला आगळा वेगळा जागतिक महिला दिवस*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामपंचायत कळसवली येथे साजरा करण्यात आला आगळा वेगळा जागतिक महिला दिवस*
*ग्रामपंचायत कळसवली येथे साजरा करण्यात आला आगळा वेगळा जागतिक महिला दिवस*
राजापूर(प्रतिनिधी):-8 मार्च 2025 रोजी ग्रामपंचायत कलसवली येथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सावित्रीबाई साठी ओवी सादर करण्यात आली. महिलांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली.
जागतिक महिला दिना निमित्त माझी वसुंधरा अभियान 5.0 व स्वच्छ भारत मिशन अभियान या दोन्ही अभियानाचा कृती संगम साधून वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण पूरक हळदी कुंकू चा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यासाठी वाण म्हणून शेवगायची रोपे वाटप करण्यात आली, शेवाग्याची रोपे वाण म्हणून निवडण्याचं कारण म्हणजे शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे अ, क आणि के तसेच कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले यांची भाजी करतात. आयुर्वेदात यांचे फायदे सांगितलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या दारात हे झाड हवं ज्यामुळे आरोग्य चांगलं राहील व पर्यावरणही चांगलं राहील. शेवगायची रोपे निवडण्या मागच दुसरं कारण म्हणजे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शेवगा लागवडीला खूप महत्व आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ला त्याचे मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणपूरक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, त्यामध्ये पर्यावरण पूरक रांगोळी, अभियानाची जनजागृती साठी मेहंदी, यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. आणि या स्पर्धा मध्ये नंबर आलेल्या महिलांना पर्यावरण पूरक बक्षीस देण्यात आले. या बक्षीसामध्ये रियूजेबल सॅनेटरी पॅड, कारण नॉर्मल पॅड मध्ये 90% प्लास्टिक असतं आणि ते इन्सिनिरेटर शिवाय पूर्ण जळत नाही. तसेच त्यामध्ये रासायनिक पदार्थ असतात जे महिलांना आरोग्यासाठी घातक असतात या दोन्ही गोष्टींचा विचार करून रियूजेबल सॅनेटरी पॅड किंवा वापरण्याचा संदेश महिलांपर्यंत पोहचेल म्हणून हे गिफ्ट देण्याचा विचार करण्यात आला. त्यानंतर दुसरं गिफ्ट फोल्डिंग कप हे दिल जेणेकरून आपण बाहेर प्रवासात जेव्हा जातो तेव्हा चहाला गाडी थांबल्यावर प्लास्टिक च्या कप मधून चहा पितो आणि कप तिथेच फेकतो त्यामुळे हा कप आपण सहज सोबत कुठेही नेऊ शकतो. आणि थुवून आपल्यासोबत ठेवू शकतो, त्यानंतर तिसरं गिफ्ट म्हणजे फोल्डिंग कापडी पिशवी, महिला बऱ्याचदा बाहेर पडताना सोबत काही नेत नाहीत आणि येताना भाजी वैगैरे घ्यावायची असते त्यासाठी मग प्लास्टिक पिशव्या शोधतात तर त्या प्लास्टिक पिशव्या शोधाव्या लागू नयेत यासाठी ही फोल्डिंग कापडी पिशवी जिचा फोल्ड केल्यावर पर्स सारखा वापर महिला करू शकतील. हे सर्व माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत घेतलेली कार्यक्रम.
त्यानंतर दुसरा विषय म्हणजे स्वच्छ भारत मिशन iअंतर्गत घेतलेली मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळा, यामध्ये महिलांना मासिक पाळी म्हणजे काय, ती कशी येते, त्याबद्दल समाजात असलेले समज, गैरसमज, मासिक पाळी मध्ये घ्यावायची काळजी, आणि मासिक पाळी साठी वापरलेले शोषके यांची योग्य विल्हेवाट कशी लावावी याबाबत मार्गदर्शन ग्रामपंचायत अधिकारी सोनाली आराख यांनी केले. ग्रामपंचायत कलसवली येथे बसाविण्यात आलेल्या इन्सिनिरेटर आणि वेंडीन मशीन याचे महिलांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.