*पांगरी बुद्रुक प्रादेशिक योजना जलद गतीने पूर्ण करण्याबाबत आ. सदाभाऊ खोत यांनी वेधले सभागृहाचे लक्ष*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पांगरी बुद्रुक प्रादेशिक योजना जलद गतीने पूर्ण करण्याबाबत आ. सदाभाऊ खोत यांनी वेधले सभागृहाचे लक्ष*
*पांगरी बुद्रुक प्रादेशिक योजना जलद गतीने पूर्ण करण्याबाबत आ. सदाभाऊ खोत यांनी वेधले सभागृहाचे लक्ष*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यामधील जल जीवन मिशन अंतर्गत पांगरी बुद्रुक प्रादेशिक योजना जलद गतीने पूर्ण करण्याबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक धरणावर परिसरातील कोंडे तर्फ राजापूर, उन्हाळे, दोनिवडे, शेंबवणे, पांगरे, ससाळे, आंगले, फुफेरे, सोलये, हसोळ, जांभवडे, पोटलेवाडी, तुळसवडे, सोलिवडे, ताम्हाणे पहिलीवाडी व धनगरवाडी या सर्व गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पांगरी बुद्रुक प्रादेशिक नळ पाणी योजना मंजूर केलेली आहे. सदर योजनेला मंजुरी मिळून जवळपास चार वर्ष झालेले असताना देखील अजूनही त्या गावांना या योजनेमधून पाणी मिळालेले नाही. माहे फेब्रुवारीपासून या गावांना पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण होते. त्या अनुषंगाने पांगरी बुद्रुक प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये ज्या अडचणी असतील त्या अनुषंगाने तेथील स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यावर उपाययोजना कराव्यात आणि सदरची योजना जलद गतीने पूर्ण व्हावी, यासाठी सदर बाब माजी राज्यमंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी सभागृहात औचित्याचा मुद्द्याद्वारे मांडली.