*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ता. तळा निगुडशेत विभाग ग्रुप नं 4 च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित हळदी कुंकू आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ता. तळा निगुडशेत विभाग ग्रुप नं 4 च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित हळदी कुंकू आयोजन*
*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ता. तळा निगुडशेत विभाग ग्रुप नं 4 च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित हळदी कुंकू आयोजन*
तळा(प्रतिनिधी):-कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ता. तळा निगुडशेत विभाग ग्रुप नं 4 च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व समाजबांधवांनी श्री मारुती मंदिरात जाऊन श्री मारुती राया, विठ्ठल रखुमाई आणि श्री कृष्ण या देवतांचे पुजन केले. यानंतर खालु बाजा सनई चौघडयाच्या निनादात सारे कार्यक्रम स्थळी आले. यानंतर कार्यक्रम अध्यक्ष रवींद्र मांडवकर, तालुका अध्यक्ष नामदेव काप, विभागीय अध्यक्ष जनार्दन पांढरे, पांडुरंग कळंबे, नरेंद्र लोखंडे, सरपंच सौ. अनिता अनिल सरकळे, सचिन दादा कदम, पदाधिकारी, महीला सदस्या आणि विभागातील जेष्ठ महोला यांचे हस्ते समाज नेते यांना पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यानंतर ईशस्तवन विद्यार्थ्यांनी गायले. तदनंतर उपस्थित
मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त माजी सभापती अक्षरा कदम, व डॉ. भगवान लोखंडे, कृष्णा भोसले यांचे महीला दिना निमित प्रबोधन झाले. यानंतर अध्यक्षीय भाषण झाले. यानंतर महीलांना हळदीकुंकू निमित्ताने वाण देण्यात आले. त्याचबरोबर सर्वांनाच महाभोजन देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील समाजबांधवांनी विशेषतः निगुडशेत ग्रामस्थ महिला मंडळ यांनी खूप मेहनत घेतली.. कार्यक्रम अत्यंत आनंदी व शांतता मय वातावरणात पार पडला.