*अ. म. कुणबी सेवा संघ शाखा वांद्रे, खार, सांताक्रूझतर्फे महिला दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अ. म. कुणबी सेवा संघ शाखा वांद्रे, खार, सांताक्रूझतर्फे महिला दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न*
*अ.म.कुणबी सेवा संघ शाखा वांद्रे, खार, सांताक्रूझतर्फे महिला दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ शाखा वांद्रे खार सांताक्रूझतर्फे जागतिक महिला दिन निमित्त महाराष्ट्र बाजार पेठ आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यातील विजेत्याला प्रथम पारितोषिक सोन्याची नथ, द्वितीय पारितोषिक पैठणी, तृतीय - चांदीची फ्रेम, चौथे पारितोषिक 10,000 चे गिफ्ट व्हाउचर देण्यात आले तसेच उपस्थित सर्व महिलांना गिफ्ट कूपन बक्षीस दिले
अ.म. कुणबी सेवा संघ शाखा वांद्रे खार सांताक्रूझच्या वतीने समाजातील महिलांसाठी 9 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिवस साजरा करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन शाखेच्या महिला अध्यक्षा सुनीता चांदिवडे, सचिव स्नेहा बावकर, खजिनदार प्राची बाईत आणि सर्व महिला कार्यकारिणीने केले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि आभार व्यक्त करण्यात आले. शाखेचे उपाध्यक्ष रमेश खांडेकर, सरचिटणीस हरिश्चंद्र मांडवकर, ज्येष्ठ सल्लागार संतोष जोगले आणि कार्यकारिणी सदस्य मनोहर धावडे, शाखेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील आणि इतर समाज बांधव उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. निवेदक दीपक तेंडुलकर यांनी उत्तम रित्या महिलांचे विविध खेळ खेळवून मनोरंजन केले. उपस्थित महिलांनी खेळाचा मनमुराद आस्वाद घेतला आणि उत्स्पूर्त प्रतिसाद देत, सहभाग घेतला आणि बक्षीस मिळवली. मर्जी या सामाजिक संघटनेने महिलांसाठी त्यांचे अधिकार याविषयावर चर्चा सत्र आयोजित केले होते. मर्जी संघटनेच्या समन्वयिका प्राप्ती कोळी आणि वैष्णवी मापगावकर (विधी शाखेच्या विद्यार्थिनी) यांनी उपस्थित महिलाना पोस्टर प्रदर्शनीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. महिला अध्यक्षा सुनीता चांदिवडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि आभार व्यक्त केले. शाखेचे ज्येष्ठ सल्लागार संतोष जोगले यांनी महिला कार्यकारिणी, महाराष्ट्र बाजार पेठचे संस्थापक/ अध्यक्ष कौतिक दांडगे यांचे, निवेदक दीपक तेंडुलकर आणि मर्जी संघटनेचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.