*अल्पसंख्यांक शाळांच्या पायाभूत सुविधेच्या अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावेत-शशांक काळे*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अल्पसंख्यांक शाळांच्या पायाभूत सुविधेच्या अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावेत-शशांक काळे*
*अल्पसंख्यांक शाळांच्या पायाभूत सुविधेच्या अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावेत-शशांक काळे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळांच्या पायाभूत सुविधा विकासासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला असून अनुदान योजनेत भरीव वाढ करत, रुपये 2 लाखावरुन आता 10 लाख रुपयांपर्यंत निधी दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत वर्ष 2024-25 मध्ये अनुदान घेवू इच्छिणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी शशांक काळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. कोणत्या शाळांना मिळणार लाभ? शासकीय अनुदानित/विना अनुदानित/ कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका /नगरपरिषद शाळा, अपंग शाळा
शासनाचा उद्देश
या वाढीव अनुदानामुळे अल्पसंख्याक शाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि पायाभूत सुविधा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
इच्छुक शाळा आणि संस्थांनी 22 फेब्रुवारी 2025पर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.