*मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मुदतवाढ-शशांक काळे*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मुदतवाढ-शशांक काळे*
*मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मुदतवाढ-शशांक काळे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी शासनाने 'डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी आता 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी शशांक काळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या योजनेच्या माध्यमातून मदरशांचे आधुनिकीकरण करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करणे हा शासनाचा उद्देश असून राज्यातील सर्व नोंदणीकृत मदरसे या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरशांनी त्यांचे प्रस्ताव 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे सादर करावेत, असेही जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी काळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.