*26 जानेवारी रोजी तळोदा येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन-आर. जी. मलशेट्टी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*26 जानेवारी रोजी तळोदा येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन-आर. जी. मलशेट्टी*
*26 जानेवारी रोजी तळोदा येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन-आर. जी. मलशेट्टी*
नंदुरबार(प्रतिनीधी):-तळोदा येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती किशोर चं. संत यांच्या हस्ते 26 जानेवारी, 2025 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे, असे नंदुरबारचे प्रभारी/प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नंदुरबारचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे हे राहणार असून न्यायालयाच्या या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभास उपस्थित रहावे. असे आवाहन दिवाणी न्यायाधीश, (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) तळोदा सुविधा ग. पाडे व अध्यक्ष वकील संघ तळोदा ॲङ रविंद्र गो. वाणी यांनी केले आहे.