*दिल्ली येथील प्रजासत्ताक कार्यक्रमात बामखेडा तत सरपंच होणार सहभागी, जल जीवन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीमुळे झाली निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दिल्ली येथील प्रजासत्ताक कार्यक्रमात बामखेडा तत सरपंच होणार सहभागी, जल जीवन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीमुळे झाली निवड*
*दिल्ली येथील प्रजासत्ताक कार्यक्रमात बामखेडा तत सरपंच होणार सहभागी, जल जीवन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीमुळे झाली निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जल जीवन मिशन अंतर्गत शहादा तालुक्यातील बामखेडा तत येथील मंजूर पाणी पुरवठा योजना यशस्वी पणे पूर्ण करून हर घर जल गाव म्हणून घोषित झाले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची उत्कृष्टपणे अंमलबजावणी केल्यामुळे बामखेडा ततचे सरपंच तथा पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे अध्यक्ष मनोज बन्सीलाल चौधरी हे सपत्नीक दिल्ली येथे 26 जानेवारी रोजी कर्तव्यपथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या गणतंत्र दिन सोहळ्यात विशेष निमंत्रित
म्हणून सहभागी होणार आहेत. राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी व स्वच्छताच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातीलच 'हर घर जल' हे एक महत्त्वाचे अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील जी गावे हर घर प्रमाणित झाली असून त्या गावांमधील पाणी पुरवठा योजना ग्रामस्थांना हस्तांतरीत करण्यात येवून या योजना ग्राम पंचायत मार्फत चालविले जात आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आठ ग्रामपंचायतींच्या
सदस्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यात गोंदिया, अकोला, अमरावती, चंद्रपूर, धुळे, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच तथा पाणीपुरवठा स्वच्छता समिती अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक विवेक गुंड, कार्यकारी अभियंता अजय पाटील, उप अभियंता महेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बामखेडा तत येथे अंदाजित 1 कोटी 8 लक्ष रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. सरपंच मनोज चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी हिम्मत राठोड व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी समन्वयाने मंजूर योजना वेळेत कार्यान्वित करून गाव हर घर घोषित केले आहे. यामुळे गावात सद्यस्थितीत दररोज ग्रामस्थांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा होत आहे.