*आमलाड येथील गौरव कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आमलाड येथील गौरव कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
*आमलाड येथील गौरव कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
नंदूरबार(प्रतिनिधी):-तळोदा तालुक्यातील आमलाड येथील गौरव आर्टस, कॉमर्स व सायन्स कनिष्ठ आमलाड येथील बारावीच्या विद्यार्थ्यांनाचा निरोप समारंभा चा कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात आला होता. निरोप समारंभ च्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मार्गदर्शक ललित पाठक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य विश्वास पवार व जेष्ठ शिक्षिका श्रीमती समिक्षा मगरे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या सत्कार गुलाबपुष्प देऊन करण्यात आले त्यानंतर उपस्थित शिक्षकांचे गुलाबपुष्प व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या या बारा वर्षात शालेय जीवनात आलेले चांगले व वाईट विचार हे आपल्या मनोगतातुन व्यक्त केले. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. त्यानंतर मार्गदर्शक ललित पाठक, प्राचार्य विश्वास पवार, श्रीमती वर्ष केदार, श्रीमती प्रियंका जव्हेरी, अरविंद गोडसे, संकेत सोजल, श्रीमती मगरे, श्रीमती मयुरी पवार, क्रीडा शिक्षक पुलायन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु.पूजा वळवी हिने केला तर शेवटी आभार विद्यार्थीनी कु.दिव्या तडवी हिने केले याप्रसंगी बारावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.