*नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांना, नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या भ्रष्टाचारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांची, तात्काळ जिल्ह्याब
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांना, नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या भ्रष्टाचारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांची, तात्काळ जिल्ह्याब
*नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांना, नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या भ्रष्टाचारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांची, तात्काळ जिल्ह्याबाहेर हकालपट्टी करणेबाबतचे निवेदन*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या भ्रष्टाचारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर हकालपट्टी करणेबाबतचे निवेदन सादर देण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी आरोग्याचे सर्व निर्देशांक उंचाविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत, व चांगल्या दर्ज्याची आरोग्यसेवा देत आहेत. डॉ. श्रीमती वर्षा लहाडे, जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार ह्या मार्च 2024 पासून नंदुरबार येथे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहे, त्यानी जेंव्हापासून या जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम सुरु केले. त्या दिवसापासून त्यांनी प्रत्येक संवर्गावर आर्थिक पिळवणुक व मानसिक खच्चीकरणाचे काम सुरु केले आहे, व आजतागायत करीत आहे. त्यांच्याबाबत विविध संघटनाकडून भ्रष्टाचाराच्या तक्रारी करीत आहेत,
तर्भ वैद्यकीय अधिकारी यांना 11 महिन्यांची ऑर्डर दिली जाते, अशा तर्थ वैद्यकीय अधिकारी यांचेकडून प्रथम नियुक्ती व पुर्ननियुक्ती देतांना डॉ. वर्षा लहाडे यांनी एक महिन्यांचा पगार एकुण 80,000 प्रत्येकी घेण्यात आलेले आहे, R.B. S.K. मधील वैद्यकीय अधिकारी यांचे Staff Nurse व Pharmacy Officer यांचेकडून वार्षिक पुर्ननियुक्ती करीता 1000 प्रत्येकी घेण्यात आले. तसेच वेतन वाढ लावण्यासाठी रु.5000 प्रत्येकी घेण्यात आले, NRC व SNCU मधील वैद्यकीय अधिकारी Staff Nurse यांचेकडून प्रथम नियुक्तीसाठी 50, 000 प्रत्येकी घेण्यात आले, तसेच वेतनवाढ लावण्यासाठी रु.5,000 प्रत्येकी व पुर्ननियुक्ती करीता रु.1,000 प्रत्येकी घेण्यात आले. NRC मधील Dietician यांचेकडून पुर्ननियुक्तीसाठी 1 लाखांची मागणी करण्यात आली, NHM अंतर्गत Staff भरतीसाठी प्रत्येकी 1 लाख ते दिड लाख रुपये घेण्यात आले, आयुष अंतर्गत Staff भरती (कंत्राटी) प्रत्येकी 2,50,000 घेण्यात आले, NCD अंतर्गत कार्यरत Stafl कडून पुर्ननियुक्तीसाठी 1000 प्रत्येकी तसेच NCD Co- Ordinator च Counceller यांचेकडून 1500 प्रत्येकी घेण्यात आले, तसेच जिल्ह्यांतर्गत प्रतिनियुक्तीसाठी व Staff Nurse यांचेकडून प्रत्येकी 50,000 घेण्यात आले, तसेच प्रतिनियुक्ती रद्द करणेसाठी देखील पैसे घेण्यात आले, वैद्यकीय अधिकारी यांच्या रजा मंजुरीसाठी दिवसानिहाय पैसे घेण्यात आले, तर्थ वैद्यकीय अधिकारी तथा सर्व कंत्राटी कर्मचारी यांचे पुर्ननियुक्ती प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर विहित कालावधीत सादर केले जात नाही, तसेच जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येते, Staff Nurse जिल्हा रुग्णालय, नंदुरबार यांचे GPF खात्यातून पैसे काढण्यासाठी 5,000 प्रत्येकी घेण्यात आले, सर्व अधिकारी व कर्मचारी (Staff Nurse) गोपनीय अहवाल (CR) लिहिणेसाठी 5,000 प्रत्येकी मागणी करण्यात आली आहे, वैद्यकीय बिल मंजुरीसाठी पैश्यांची मागणी होते, जिल्हा रुग्णालयातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना एकस्तर वेतनश्रेणी लावण्यासाठी पैशांची मागणी करतात, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील पदव्युत्तर व पदवीधारक वैद्यकीय अधिकारी यांना शासन निर्णयात नमुद असतांना देखील 6 व 3 वेतनवाढी अद्याप लागु करण्यात आलेल्या नाही न लागु करण्याचे प्रयोजन काय?, पेटी Supply (रुग्णालयात लागणारे Logistics) वार्षिक मागणी 5 कोटी रुपयांचे अवैध खरेदी केली आहे, सदर खरेदीचे कुठलेही व्हाऊचर उपलब्ध नाही, तर्दा वैद्यकीय अधिकारी यांचे गेल्या 6 महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आलेले नाही, डॉ. लहाडे यांच्या कार्यालयातील दारासमोर CCTV कैमेरावर चिकटपट्टी लावलेली आहे, तसेच Visitor (अभ्यंगत) येणारे यांचे Mobiles बाहेर ठेवायला भाग पाडले जाते, वरील दोन्ही बाबी संशयास्पद असून, याचे प्रयोजन काय?, डॉ. वर्षा लहाडे ह्या स्त्री रोगतज्ञ म्हणून जिल्हा रुग्णालय नाशिक येथे कार्यरत असतांना त्यांच्यावर MTP 1971 च्या कायद्यान्वये स्त्री भ्रूण हत्येसारखा गंभीर गुन्हा IPC 668, 471, 420, 177, 178, 186 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. अश्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना जिल्हा शल्यचिकित्सकपदी का नेमणूक देण्यात आली?, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना दबावात ठेवतात व अरेरावीची भाषा वापरतात, तसेच अपशब्द व लज्जास्पद शब्द वापरुन मानसिक खच्चीकरण करतात, रुग्णालयातील कामांची माहिती स्थानिक प्रसार माध्यमांना देणेपूर्वी माझ्या पूर्वपरवानगी शिवाय व माझे नाव असल्याशिवाय द्यायचे नाही अशी धमकी दिली जाते,
वरील सर्व बाबींमुळे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे, अशा भ्रष्टाचारी, आर्थिक पिळवणुक करणाऱ्या मानसिक त्रास देणाऱ्या, हिन वागणूक देणाऱ्या, अरेरावी, दमदाटी करणाऱ्या, अपशब्द वापरणाऱ्या अशा जिल्हा शल्यचिकित्सक यांची जिल्ह्याबाहेर तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी व कडक कारवाई करण्यात यावी, डॉ. वर्षा लहाडे यांची तात्काळ हकालपट्टी न केल्यास जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी
व आरोग्य कर्मचारी तिव्र आंदोलन करतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर डॉक्टर किसन पावरा डॉक्टर रणजीत पावरा डॉक्टर नरेश पाडवी डॉक्टर जर्मन सिंग पाडवी डॉक्टर राहुल वसावे डॉक्टर मंगलसिंग पावरा डॉक्टर पार्थावत बागुल डॉक्टर विनायक गावित यांच्या स्वाक्षऱ्या आहेत