*डी आर हायस्कूल येथे ई-कचरा जनजागृती व संकलन अभियानाचे उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी आर हायस्कूल येथे ई-कचरा जनजागृती व संकलन अभियानाचे उद्घाटन*
*डी आर हायस्कूल येथे ई-कचरा जनजागृती व संकलन अभियानाचे उद्घाटन*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे पूर्णम फाउंडेशन पुणे, नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल, श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम यांचा संयुक्त विद्यमाने ई-यंत्रण 2025 या अभियानाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन नरेंद्र सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्रशांत पाठक, कार्यकारिणी सदस्य अशोक टेंभेकर, मुख्याध्यापक पंकज पाठक, उपप्राचार्य मोहन अहिरराव, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक हेमंत खैरनार हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन नरेंद्र सराफ यांनी ई कचरा व त्याचे दुष्परिणाम याबाबत जागरूक असावे असे सांगितले. मुख्याध्यापक पंकज पाठक यांनी ई कचरा किती प्रमाणत जमा होत आहे व त्याची विल्हेवाट लावणे किती उपयुक्त याची माहिती दिली. विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या घरातील ई कचरा शाळेतील संकलन केंद्रावर जमा करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच या अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक पंकज पाठक यांनी केले. या अभियानंतर्गत 24 जानेवारी रोजी दीनदयाल चौक पोस्ट ऑफिस जवळ ई कचरा संकलन करण्यासाठी केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्रावर सर्व नागरिकांनी आपल्या घरातील ई कचरा गोळा करावा असेही आवाहन विद्यार्थी व शिक्षकांमार्फत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर विंचुरकर प्रास्ताविक मनीष वळवी आभार प्रदर्शन निलेश गावित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.