*जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्रायल येथे रोजगाराची संधी-विजय रिसे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्रायल येथे रोजगाराची संधी-विजय रिसे*
*जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्रायल येथे रोजगाराची संधी-विजय रिसे*
नंदुरबार(प्रतिनीधी):-कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना, इस्त्रालय देशामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
इस्त्राल या देशामध्ये घरी काळजी घेणारा (Home Based Caregiver) या पदासाठी भरती प्रक्रिया चालू आहे. या पदासाठी पात्रतेचे निकष व जाहिरातीचा तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय वर्ष 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनमध्ये सहभागी होणास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहु (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यता प्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पुर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पुर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए/एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सिंग/ पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. या संधीचा लाभ जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी घ्यावा यासाठी या विभागाच्या https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.