*अक्कलकुवा तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी अनिल जावरे तर सचिवपदी नितीन चौधरी यांची सर्वानुमते निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी अनिल जावरे तर सचिवपदी नितीन चौधरी यांची सर्वानुमते निवड*
*अक्कलकुवा तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी अनिल जावरे तर सचिवपदी नितीन चौधरी यांची सर्वानुमते निवड*
अक्कलकुवा(प्रतिनीधी):-अक्कलकुवा तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी अनिल जावरे तर सचिवपदी नितीन चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर कापुरे होते. नूतन कार्यकारणी निवडीसाठी अक्कलकुवा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली. अक्कलकुवा तालुका पत्रकार संघाची अक्कलकुवा येथील शासकीय विश्राम गृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते नुतन कार्यकारणी निवड करण्यात आली, त्यात अक्कलकोट तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनिल जावरे, उपाध्यक्ष इम्रान पठाण, मिलिंद गुलाले, कार्याध्यक्ष डॉ. जसपालसिंग वळवी, सचिव नितीन चौधरी, सहसचिव अरुण मोरे, कोषाध्यक्ष प्रभू तडवी, सहकोषाध्यक्ष गंगाराम पाडवी, संघाचे जेष्ठ सल्लागार म्हणून मधुकर कापुरे, वेस्ता पाडवी, रवींद्र गुरव, योगेश्वर बुवा, कैलास खोंडे तर कार्यकारणी सदस्यपदी शुभम भंसाली, किशोर मराठे, हेमंत परदेशी, कैलास नागमल, कमलेश शिंदे, जगदीश खोंडे, रवींद्र वळवी, प्रशांत मराठे, तुषार नाईक, अल्ताफ पठाण, चंद्रकांत चव्हाण, गौतम गवळे, अतुल सूर्यवंशी, श्रीमती सुमित्रा वसावे यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी निवड झालेल्या अनिल जावरे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वप्रथम निवडीबद्दल संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले, अक्कलकुवा तालुक्यासह दुर्गम भागातील सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी तसेच त्यांच्या विविध समस्या समस्या, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी घेतलेला वसा सर्व पत्रकारांनी आजच्या धावपळीच्या युगात अखंडपणे सुरू ठेवावा, पत्रकारांनी आपल्या लेखणीतून नवीन आदर्श समाजासमोर ठेवावा असे सांगितले, यावेळी नूतन अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.