*हसोळ प्रीमियर लीग-2025 उत्साहात पार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हसोळ प्रीमियर लीग-2025 उत्साहात पार*
*हसोळ प्रीमियर लीग-2025 उत्साहात पार*
राजापूर(प्रतिनीधी):-प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हसोळ प्रीमियर लीगचे आयोजन खूप मोठ्या उत्साहात पार पडले. त्यासाठी लाभलेल्या सर्व देणगीदार, हितचिंतक यांचे व संघांनी तसेच गावातील रहिवाशी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देण्यात आले. एकजुटीने काही अशक्य कामे सहज सोपी होतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हसोळं प्रिमियर लीग 2025 हसोळ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची सुरुवात 2021 मध्ये झाली, म्हणता म्हणता एक नाही दोन नाही यावर्षी 5 व्या पर्वाचे आयोजन हसोळ प्रिमियर लीग धूमधडक्यात डोळ्याचे पारडे फेडण्यासारखे केले. ही स्पर्धा youtube माध्यमातून live 15000 लोकांनी बघितली
पारितोषिक विजेते संघ आणि खेळाडू प्रथम क्रमांक कुळये टेबवाडी, द्वितीय क्रमांक शिवमंडळ मेजारी वाडी, तृतीय क्रमांक आई नवलादेवी क्रिकेट संघ वरची वाडी, चतुर्थ क्रमांक फणसवाडी बॉईज, शिस्तबद्ध संघ नवलादेवी स्ट्रायकर्स बोभाटे वाडी, मालिकावीर :- शैलेश परवडे (फणसवाडी), उत्कृष्ट फलंदाज विकी मेजारी (मेजारी वाडी), उत्कृष्ट गोलंदाज निखिल कुळये टेंबवाडी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहुल कुळये (टेंब वाडी), उदयोन्मुख खेळाडू निखिल कुळये (टेंब वाडी), हसोळ प्रीमियर लीग 2025 पर्व 5 वे यासाठी सहकार्य लाभले त्त्यांचे सर्वांचे हसोळ प्रीमियर लीग समितीतर्फे धन्यवाद देण्यात आले.