*कोकणातून जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासकीय सेवेत असणारच-सत्यवान रेडकर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकणातून जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासकीय सेवेत असणारच-सत्यवान रेडकर*
*कोकणातून जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासकीय सेवेत असणारच-सत्यवान रेडकर*
सिंधुदुर्ग(प्रतिनीधी):-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्रातील प्रख्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) यांनी वैभववाडी तालुक्यात आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी, व आचिर्णे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आचिर्णे येथे 308-309 वे नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान दिले. या कार्यक्रमासाठी विजय रावराणे, प्रभानंद राणे, शरद रावराणे यांनी पुढाकार घेतला होता. दोन्ही शैक्षणिक संकुलातील प्राचार्य, सहायक प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कोकणातून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत, शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी रेडकर सर नेहमी प्रयत्नशील असतात. या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला व स्पर्धा परीक्षेचे धडे प्राप्त केले, विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले.