*संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद तर नाशिक जिल्ह्याला
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद तर नाशिक जिल्ह्याला
*संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद तर नाशिक जिल्ह्याला सर्वसाधारण उपविजेतेपद*
नंदुरबार(प्रतिनीधी):-संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद तर नाशिक जिल्ह्याला सर्वसाधारण उपविजेतेपद देण्यात आले. विविध मान्यवरांचा उपस्थितीत पारितोषिक वितरण करून स्पर्धेच्या समारोप करण्यात आला. यापुढील स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यात होणार आहेत. येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत आयोजित दोन दिवसीय नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचा समारोप झाला असून स्पर्धेतील विजेत्या संघ व खेळाडूंना जळगाव तापी खोरे महामंडळाचे वित्त संचालक एन डी महाजन यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी नाशिक विभागाचे लेखा व कोषागारे सहसंचालक महेश बच्छाव नासिक विभागाचे स्थानिक निधी लेखापरीक्षा सहसंचालक दीपक बिरारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. नासिक विभागीय क्रीडा स्पर्धेत नंदुरबार, धुळे, जळगाव, नासिक, अहिल्यानगर या पाचही जिल्ह्यातील कोषागार, स्थानिक निधी लेखापरीक्षा व इतर विभागातील कार्यरत महाराष्ट्र वित्त व लेखा सेवाचे अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे 400 हून अधिक खेळाडू उपस्थित होते. यात वैयक्तिक व सांघिक खेळांची स्पर्धा घेण्यात आली. समारोपप्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. नंदुरबार जिल्ह्याला हॉलीबॉल पुरुषचे विजेतेपद मिळाले. दोन दिवसीय कार्यक्रमात क्रीडा स्पर्धांसह संस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. समारोपप्रसंगी क्रीडा ध्वज नाशिक जिल्ह्याकडे सुपुत करण्यात आला. सदर स्पर्धेत नाशिक विभागातील मुख्य वित्त व लेखा अधिकारी, उपसंचालक, मुख्य लेखापरीक्षक, नाशिक विभागीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते. नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धा यशस्वीरिता पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा प्रतीक जांभळे, जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे, नगरपालिकेचे लेखापरीक्षक वैशाली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा अधिकारी सुंदरसिंग पावरा व वित्त विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
क्रीडा स्पर्धा समारोप प्रसंगी विजेत्या संघांनी जल्लोष केला.